गृह मंत्रालय

केंद्रीय मंत्रिमंडळाचे निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगून या निर्णयांचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याकडून स्वागत


आजचे निर्णय आत्मनिर्भर भारत, गरिबांचे कल्याण व या आव्हानात्मक काळात अर्थव्यवस्था मजबूत करण्याप्रती मोदी सरकारच्या कटिबद्धतेची पुन्हा प्रचीती देणारे असल्याचे अमित शहा यांचे प्रतिपादन

Posted On: 24 JUN 2020 11:33PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचे आजचे निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगून त्यांचे स्वागत केले आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. आजचे निर्णय आत्मनिर्भर भारत, गरिबांचे कल्याण व या आव्हानात्मक काळात अर्थव्यवस्था मजबूत करण्याप्रती मोदी सरकारच्या कटिबद्धतेची पुन्हा प्रचीती देणारे असल्याचे, त्यांनी म्हटले आहे.

15,000 कोटी रुपयांच्या पशुपालन पायाभूत विकास निधीला मंजुरी देण्याच्या निर्णयाची प्रशंसा त्यांनी केली. यामुळे आत्मनिर्भर भारत घडवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न अधिक दृढ होणार असल्याचे ते म्हणाले. दुग्ध क्षेत्राला मिळणाऱ्या या मोठ्या चालनेमुळे रोजगार वाढणार आहेत. यामुळे दूध उत्पादकता व निर्यातही नक्कीच वृद्धिंगत होईल, असे शहा यांनी म्हटले आहे.

अंतराळ उपक्रमात खाजगी क्षेत्राच्या सहभागाचे स्वागत करतानाच या ऐतिहासिक सुधारणेमुळे भारताची वास्तविक अंतराळ क्षमता समोर येईल. आयएन-एसपीएसी, इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरमुळे, अंतराळ उपक्रमात खाजगी उद्योगांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळेल; तसेच अंतराळ क्षेत्रातल्या विकासाला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.

कोविडमुळे प्रतिकूल परिणाम झेलणाऱ्या छोट्या व्यवसायांना मोठा दिलासा देणारा आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. मुद्रा योजनेअंतर्गत शिशु कर्जधारकांची आर्थिक चिंता कमी व्हावी, यासाठी पात्र कर्ज धारकांना 12 महिन्यासाठी 2% व्याज सवलत देण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

बँकिंग क्षेत्रातल्या अध्यादेशाला मंजुरी देण्याबाबत बोलताना, यामुळे 1482 नागरी सहकारी बँका व 58 बहु राज्य सहकारी बँका रिझर्व बँकेच्या निगराणीखाली येणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे बँक खातेदारांच्या कष्टाच्या पैशाचे रक्षण होत औपचारिक बँकिंग व्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास वाढेल, असे त्यांनी म्हटले आहे.

I thank and congratulate PM Shri @narendramodi ji, as cabinet today approved several landmark decisions. These decisions are yet another manifestation of Modi government's commitment towards self-reliance, welfare of poor and strengthening the economy in these challenging times.

— Amit Shah (@AmitShah) June 24, 2020

To further strengthen Modi Govt's efforts towards Atmanirbhar Bharat, cabinet has approved Animal Husbandry Infrastructure Development Fund worth ₹ 15000 crore. This enormous boost to the dairy sector will surely surge employment, increase milk productivity and exports.

— Amit Shah (@AmitShah) June 24, 2020

Private sector participation in Space activities has also been approved by the Modi Government, this historic reform will unlock India's true space potential. IN-SPACe will accelerate growth of the space sector by promoting and guiding private industries in space activities.

— Amit Shah (@AmitShah) June 24, 2020

To alleviate financial stress of Shishu loan borrowers under Mudra Yojana, Modi Cabinet has approved 2% interest subsidy for a period of 12 months for eligible borrowers. This will provide a huge relief to small businesses which have been adversely affected by Covid.

— Amit Shah (@AmitShah) June 24, 2020

Modi cabinet has also approved an Ordinance to bring 1482 urban cooperative & 58 multi-state cooperative banks under the supervision of RBI. This will give an assurance to the bank depositors & boost their trust in the formal banking system by protecting their hard-earned money.

— Amit Shah (@AmitShah) June 24, 2020

*****

S.Pophale/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634214) Visitor Counter : 158