गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोविड-19 साथीच्या आजारामुळे आव्हानांना सामोरे जाणाऱ्या स्थलांतरीत कामगार आणि गरिबांना मदत आणि सक्षम करण्यासाठी 50000 कोटी रुपयांचे ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार


लोक रोजगाराच्या शोधात शहरांमध्ये स्थलांतर करीत होते पण आता ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ अंतर्गत त्यांना त्यांच्या कौशल्याच्या आधारे त्यांच्या घराजवळच रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल - अमित शाह

‘गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत लोकांच्या कलागुणांचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी केला जाईल, जे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी आणि बळ देईल’- केंद्रीय गृहमंत्री

मोदी सरकार आपल्या गावांचा विकास, स्थलांतरित कामगार आणि गरिबांची उपजीविका आणि स्वाभिमान जपण्यासाठी कटीबद्ध - केंद्रीय गृहमंत्री

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने वाटचाल आणि गरीब कल्याण रोजगार अभियानाची यात महत्त्वपूर्ण भूमिका’ – अमित शाह

Posted On: 20 JUN 2020 10:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2020

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 50000 कोटी रुपयांचे ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या मोहिमेमुळे कोविड-19 साथीच्या आजारामुळे संकटात सापडलेल्या स्थलांतरित कामगार आणि गरिबांना दिलासा आणि सामर्थ्य मिळेल. अमित शाह म्हणाले की, 6 राज्यांमधील 116 जिल्ह्यांतील गावे ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ चा भाग असतील.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, या अभियानांतर्गत भारत सरकारतर्फे ग्रामीण भागात आधीच राबविण्यात येत असलेली 25 विविध कामे / उपक्रम आणि योजना एकत्रित करण्यात येतील.

अमित शाह म्हणाले, पूर्वी लोक रोजगाराच्या शोधात शहरांमध्ये स्थलांतर करीत होते पण आता ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ अंतर्गत त्यांच्या कौशल्याच्या आधारे त्यांना त्यांच्या घराजवळ रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यांच्या प्रतिभेचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी केला जाईल, जे ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी आणि बळ देईल.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, मोदी सरकार आपल्या गावांचा विकास आणि स्थलांतरित कामगार आणि गरिबांची उपजीविका व स्वाभिमान जपण्यासाठी संपूर्णतः वचनबद्ध आहे. अमित शाह पुढे म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि गरीब कल्याण रोजगार अभियान त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल’

 

* * *

S.Thakur/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1633087) Visitor Counter : 141