रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी शेजारी देशांशी सामंजस्य कराराची तरतूद करण्याच्या उद्देशाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यासाठी सूचना आमंत्रित


Posted On: 20 JUN 2020 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2020

प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसंदर्भात शेजारी देशांशी सामंजस्य कराराची तरतूद करण्याच्या उद्देशाने मोटार वाहन कायद्यातील प्रस्तावित सुधारणांसदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्वसामान्य नागरिकांसहित सर्व संबंधितांकडून सूचना आणि शिफारशी मागवल्या आहेत. याबाबतची अधिसूचना 18 तारखेला प्रसिद्ध करण्यात आली असून ती www.morth.gov.in.येथे पाहता येईल.

मंत्रालयाने या अधिसूचनेचा 18 जून 2020 रोजीचा मसुदा GSR 392 (E) जारी केला असून मालाची आणि प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची भारतीय राज्ये आणि इतर शेजारी देशांदरम्यान वेळोवेळी वाहतूक करण्यासाठी मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत आवश्यक असलेल्या पूरक नियमांची विविध सरकारी विभाग आणि राज्यांकडून विचारणा केली जात आहे. अमृतसर  आणि लाहोर(2006), नवी दिल्ली आणि लाहोर(2000), कलकत्ता आणि ढाका(2000) आणि अमृतसर आणि नानकाना साहिब(2006) या दरम्यानच्या बससेवांबाबत मंत्रालयाने नियम अधिसूचित केले आहेत. भारत आणि इतर शेजारी देशांदरम्यान झालेल्या सामंजस्य करारांतर्गत वाहतूक सुरू करण्यासाठी या सर्व नियमांना अंतिम करण्यात आले आहे. 17-10-2018 रोजी रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बांगलादेशमधून नोंदणीकृत एलपीजी ट्रकच्या भारतीय प्रदेशात त्रिपुरामध्ये बिशालगड येथील एलपीजी बॉटलिंग प्लांटमध्ये मोठ्या संख्येने एलपीजी वाहून नेण्यासाठी  वर्दळीसंदर्भात नियम अधिसूचित केले होते.

वर उल्लेख केलेली सर्व प्रकरणे विचारात घेऊन आणि सामंजस्य करारांतर्गत भारत आणि शेजारी देशांमध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ये-जा करता यावी यासाठी एक प्रमाणित मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शिफारशी किंवा सूचना संयुक्त सचिव, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, वाहतूक भवन, पार्लमेंट स्ट्रीट, नवी दिल्ली-110001 येथे 17 जुलै 2020 पर्यंत पाठवता येतील. (email: jspb-morth[at]gov[dot]in)

 

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1633015) Visitor Counter : 191