विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

औषधी आणि सुगंधी वनस्पतींवर छायाचित्रण स्पर्धेची सीआयएमएपीची घोषणा


‘जाणून घ्या आपल्या औषधी वनस्पती आणि सुगंधी वनस्पती’ (मेडिकल अँड आरोमॅटिक प्लँट- मॅप) हा स्पर्धेचा विषय आहे

या स्पर्धेच्या माध्यमातून औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा सीयएमएपीलाचा उद्देश

Posted On: 14 JUN 2020 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जून 2020

औषधी आणि सुगंधी वनस्पती यांनी नेहमीच समाजाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यापैकी काही अतिशय सुंदर आणि काही अतिशय दुर्मिळ असतात, सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत. मानव आणि प्राणी यांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी या वनस्पतींचे अंगभूत महत्त्व बऱ्याच वर्षांपासून आहे. त्याचवेळी, आपल्यापैकी बरेचजण या औषधी वनस्पतींच्या उपयोगीतेबाबत आणि वैद्यकीय वापराबाबत अनभिज्ञ आहेत. या वनस्पतींची उपयोगिता आणि त्यांच्या वैद्यकीय महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी, केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थेने (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल आणि आरोमॅटिक प्लान्ट्स – सीआयएमएपी) औषधी आणि सुगंधी वनस्पतींबाबत छायाचित्रण स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेमधून, औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचा संदेश सीआयएमएपी देणार आहे.

जाणून घ्या आपल्या औषधी वनस्पती आणि सुगंधी वनस्पती (मेडिकल अँड आरोमॅटिक प्लँट- मॅप) हा या छायाचित्रण स्पर्धेचा विषय आहे. विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे रुपये 5000, रुपये 3000 आणि रुपये 2000 रोख रकमेचे पारितोषिक मिळणार आहे. या व्यतिरिक्त, 10 स्पर्धकांना 1000 रु. चे प्रोत्साहनात्मक पारितोषिक दिले जाणार आहे.

ही स्पर्धा सर्व नवोदित आणि व्यावसायिक भारतीय छायाचित्रकारांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. प्रत्येक प्रवेशिकेसोबत तीन छायाचित्र सादर करता येतील. यामध्ये देशी वनस्पतींना प्राधान्य देण्यात येईल आणि सहज आढळणारी फळबागेची झाडे किंवा शोभेच्या वनस्पतींची छायाचित्रे टाळण्याची विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रत्येक छायाचित्रात वनस्पतीचे योग्य लॅटिन आणि स्थानिक भाषेचे नाव आणि त्याचे औषधी आणि सुगंधित महत्त्व सुमारे 20- 30 शब्दात नमूद केले पाहिजे. केवळ मूळ डिजिटल प्रतिमा स्वीकारल्या जातील परंतु, प्रवेशिकांसोबत ए 4 पृष्ठावर मुद्रित केलेल्या आणि अनमाऊंट केलेल्या रंगांच्या प्रिंट्ससह घ्याव्या लागतील. छायाचित्रांच्या डिजिटल प्रती 3 एमबी पेक्षा कमी नसाव्यात आणि कमीतकमी 300 डीपीआय रिझोल्युशन असावे. जेपीएजी किंवा टीआयएफएफ प्रकारात छायाचित्र असावे आणि त्याची दृष्य प्रतिमानता 1086 X 768 रिझोल्युशन असावे आणि लांबी 1086 पेक्षा अधिक नसावी. छायाचित्र पारितोषिक प्राप्त ठरले तर कालांतराने त्याची मूळ प्रत मागवली जाऊ शकते.

स्पर्धकांना ई-मेलद्वारे प्रवेशिका सादर करताना, संबंधित छायाचित्र त्यांनी स्वतःच काढले असल्याचे स्वघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. छायाचित्राचे कॉपीराइट हे संबंधित छायाचित्रकाराचेच राहणार आहेत, परंतु, ते प्रदर्शित करण्याचे अधिकार सीआयएमएपीकडे असतील आणि औषधी आणि सुगंधी वनस्पतींबाबत जागृती, जाहिरात करताना त्याचा वापर प्रसिद्धी माध्यम म्हणून केला जाऊ शकतो.

सीएसआयआर- सीआयएमएपी, लखनऊचे संचालक यांनी नेमलेले परीक्षक विजेत्यांची निवड करतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सीएसआयआर-सीआयएमएपीच्या वार्षिक संमेलनात विजेत्यांची घोषणा करण्यात येईल.

डिजिटल छायाचित्र pc@cimap.res.in. या मेलवर पाठवावी. 30 जून 2020 ही स्पर्धेसाठी छायाचित्र सादर करण्याची शेवटची तारीख आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी www.cimap.res.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.

 

S.Thakur/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1631535) Visitor Counter : 1023