विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सामान्य धोरण आणि सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी डीएसटीने संयुक्त विज्ञान दळणवळण मंच केला स्थापन

Posted On: 11 JUN 2020 10:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2020


विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने विविध सार्वजनिक क्षेत्रातील विज्ञान दळणवळण संस्था आणि एजन्सींमध्ये संवाद, सहकार्य आणि समन्वय साधण्याच्या उद्देशाने एक संयुक्त विज्ञान दळणवळण मंच स्थापन केला आहे.

हा मंच विविध संस्थांमध्ये सुरु असलेले विज्ञान दळणवळणाच्या (संप्रेषण) प्रयत्नांना एकत्र आणतो आणि राष्ट्रीय धोरण दळणवळणाच्या आराखड्याकडे लक्ष वेधून व्यापक स्तरावर सामान्य धोरण आणि उत्तम पद्धती अवलंबण्यास मदत करू शकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यतिरिक्त कृषी, आरोग्य, संस्कृती, संरक्षण, अवकाश, अणु ऊर्जा आणि माहिती व प्रसारण यासह विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचे प्रतिनिधित्व आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा म्हणाले की, हा मंच देशातील मॅक्रो (वृहत) आणि सूक्ष्म दोन्ही स्तरावर विज्ञान दळणवळण (संप्रेषण) कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीची आणि योजनांच्या अंमलबजावणीवर कार्य करेल, ज्यामुळे विज्ञानाबद्दल जागरूकता वाढेल आणि मोठ्या प्रमाणात विज्ञानात रस निर्माण होईल. नवोन्मेषाला चालना देणारा एक समाज निर्माण केला जाईल जो आत्मनिर्भर भारताच्या परिसंस्थेत आपले योगदान देईल.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान दळणवळण (एनसीएसटीसी) सचिवालय मंचाला सहकार्य देईल. एनसीएसटीसी देशातील विविध संस्था, कार्यक्रम आणि विज्ञान संप्रेषण केंद्रित उपक्रमांच्या समन्वयासाठी कार्य करते. ही परिषद विज्ञान समजून घेणे आणि लोकांमध्ये विज्ञानाची रूची वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशभरात कार्यक्रम आयोजित करणे, देशातील विज्ञान संप्रेषण आणि विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी धोरणे आणि इतर क्रियाकलापांचे आयोजन करण्याची देखील जबाबदारी आहे.

विज्ञान दळणवळणासाठी (संप्रेषणासाठी) भारताची मजबूत संघटनात्मक रचना आहे. विज्ञान दळणवळणाच्या (संप्रेषणाच्या) विकासासाठी कमीतकमी पाच राष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत - राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आणि सूचना स्रोत संस्था (1951), होमी भाभा विज्ञान शिक्षणकेन्द्र (1974),  राष्ट्रीय विज्ञान वस्तुसंग्रहालय परिषद (1978), राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान दळणवळण परिषद (1982), आणि विज्ञान प्रसार (1989). याव्यतिरिक्त, विविध वैज्ञानिक संस्थांचे त्यांचे विज्ञान दळणवळण (संप्रेषण) विभाग आहेत. यामध्ये विज्ञान प्रसार एकक (सीएसआयआर), कृषी ज्ञान व्यवस्थापन संचालनालय (आयसीएआर), प्रकाशने व माहिती विभाग (आयसीएमआर), जनसंपर्क संचालनालय (डीआरडीओ), जन जागरूकता विभाग (डीएई), मीडिया आणि जनसंपर्क कार्यालय (इसरो), विज्ञान कक्ष, आकाशवाणी इत्यादीचा समावेश आहे. बहुतेक सर्व राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक संस्थांमध्ये विज्ञान संप्रेषण आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही संस्थागत यंत्रणा आहेत.

या संस्था विज्ञान दळणवळणात (संप्रेषणात) हातभार लावण्यासाठी आणि त्यांचे मत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध पद्धती आणि माध्यमांचा उपयोग करीत आहेत. तथापि, सामान्य धोरणे विकसित करण्यासाठी आणि व्यापक स्तरावर सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी संवाद आणि एकत्रीकरणासाठी यामध्ये पुरेसा वाव आहे. देशव्यापी कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यातून राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आराखडा उभा होऊ शकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी विविध हितधारकांमध्ये संवाद, सहकार्य आणि समन्वय असणे आवश्यक आहे जेणेकरून चांगले धोरण तयार होऊ शकेल आणि देशात मोठ्या प्रमाणात विज्ञान संप्रेषण कार्यक्रम राबविले जातील.

 

(अधिक माहितीसाठी एनसीएसटीसीचे सल्लागार आणि प्रमुख डॉ. मनोज कुमार पटेरिया यांच्याशी संपर्क साधा: mkp[at]nic[dot]in मोबाइल: 9868114548)

 

* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631088) Visitor Counter : 287


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu