ग्रामीण विकास मंत्रालय
मनरेगासाठी 2020-2021 आर्थिक वर्षासाठी आतापर्यंतची सर्वाधिक 1,01,500 कोटी रुपये इतकी तरतूद, 31,493 कोटी रुपये यापूर्वीच प्रदान
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 6.69 कोटी लोकांना रोजगार; मे 2020 मध्ये सरासरी 2.51 व्यक्तींना दररोज रोजगार पुरवण्यात आला, गेल्यावर्षीच्या मे महिन्यात पुरवण्यात आलेल्या रोजगारापेक्षा 73% नी जास्त
सन 2020-2021 मध्ये आतापर्यंत एकूण 10 लाख कामे पूर्ण; जलसंधारण आणि सिंचन, वृक्षारोपण, फलोत्पादन आणि वैयक्तिक लाभार्थ्यांच्या उपजीविकेच्या कामांवर लक्ष केंद्रित
Posted On:
08 JUN 2020 10:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2020
चालू आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत 1,01,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत आतापर्यंतची ही सर्वात जास्त निधीची तरतूद आहे.
सन 2020-2021मध्ये 31,493 कोटी रुपये यापूर्वीच जारी केले आहेत, जे चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील तरतूदीपेक्षा 50% नी जास्त आहेत.
आतापर्यंत एकूण 60.80 कोटी श्रम दिवस झाले आहेत आणि 6.69 कोटी लोकांना काम पुरवण्यात आले आहे. मे 2020 मध्ये दररोज काम करणाऱ्या व्यक्तींची सरासरी संख्या 2.51 कोटी आहे, जी गेल्या वर्षी मे महिन्यात देण्यात आलेल्या कामांपेक्षा 73% नी जास्त आहे, गेल्या वर्षी दररोज 1.45 कोटी लोकांना काम देण्यात आले होते.
चालू आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये आतापर्यंत एकूण 10 लाख कामे पूर्ण झाली आहेत. जलसंधारण आणि सिंचन, वृक्षारोपण, फलोत्पादन आणि वैयक्तिक लाभार्थी यांच्या उपजीविकेसंदर्भातील कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1630403)
Visitor Counter : 301