विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

आयएएएसएसटीने तयार केला कृत्रिम बुध्दीमत्ता वापरून मुखकर्करोगाचे निदान त्वरीत आणि बिनचूक करणारा संगणकीय आराखडा


कर्करोगाच्या सर्व प्रकारांपैकी  पुरुषांचे 16.1%  कर्करोग  तर स्त्रियांचे  10.4% कर्करोग असतात मुखकर्करोग

Posted On: 07 JUN 2020 9:45PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अधिपत्याखालील गुवाहाटी येथील इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ( IASST) या  स्वायत्त संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुध्दीमत्तेच्या आधारे (AI) तर्कशास्त्रीय गणन करून मुखकर्करोगाचे (ओरल स्क्वँमस सेल कार्सिनोमा ) निदान आणि शक्यता वर्तवणारे साधन तयार केले आहे.

आयएएसएसटीच्या सेंन्ट्रल सायन्स आणि न्यूमरिकल विभागाच्या डॉ. लिपी बी. महंता यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी तयार केलेल्या या आराखड्याच्या सहाय्याने अशा मुखकर्करोगाची प्रतवारी देखील करता येणे शक्य झाले आहे.

मुखकर्करोगाबाबत देशातील स्थिती सांगणारा माहितीसंच नसताना या संशोधकांनी  देशातील स्थिती सांगणारा माहितीसंच सहयोगाने तयार केला.

कृत्रिम बुध्दीच्या तंत्रज्ञानाचा कुशल उपयोग करून घेत तर्कशुध्द विचार मांडत या संशोधकांनी मुखकर्करोगाची प्रतवारी करण्यात अपूर्व यश मिळविले आहे. आधी तयार केलेल्या सखोल कन्व्होल्युशन  न्यूरल नेटवर्क  (CNN) या विषयाच्या आधारे औपचारीक विनंती पाठवत दोन प्रकारे या  विषय़ाचा अभ्यास करण्यात आला.

वर्गीकरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आधीच तयार केलेल्या अंलेक्सनेट, व्हीजीजी 16, व्हीजीजी 19 रेसनेट-50, या चार मॉडेल्सपैकी, प्रस्तावित सीएनएनसाठी फीट होणारे सर्वात योग्य मॉडेल निवडले गेले. वर्गीकरणाच्या बाबतीत रेसनेट-50 या मॉडेलने 92.15% इतका अचूकपणा दाखवला असला तरी  प्रस्तावित सीएनएन प्रारुपाने कमालीचे यशस्वी काम करत  97.5% इतकी अचूकता दाखविली. हे संशोधन न्यूरल नेटवर्कच्या पत्रिकेत प्रसिध्द झाले आहे.

सध्या संशोधक त्यांची गणने  चाचणीच्या ठिकाणी सहजपणे नेता येतील अशा प्रकारचे  योग्य साँफ्टवेअर तयार करण्यात गुंतले आहेत.आरोग्यक्षेत्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली सध्याची  विभिन्नता लक्षात घेता हे तंत्रज्ञान आरोग्यक्षेत्रासाठी उपलब्ध असणे हे  यापुढील आव्हान आहे. डॉ. महंता यांची उत्कट इच्छा आहे ,की या  सर्व  पायाभूत सुविधांचा उपयोग करून हे आव्हान स्विकारावे तसेच हे सॉफ्टवेअर  यशस्वी, अचूक आणि वेळ वाचवणारे आहे का याची चाचपणी रुग्णालयांतून व्हावी.

कर्करोगाच्या सर्व प्रकारापैकी मुखकर्करोगाचे पुरुषांमधील प्रमाण 16.1%  तर महिलांमधे   10.4%  इतके असून ईशान्य भारतात हे प्रमाण लक्षणीय आहे. सुपारी आणि तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाच्या पोकळीतील भागांत  कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.

मुखकर्करोगात, सूक्ष्मदर्शकाखाली पेशींची रचना पाहिल्यास पेशींच्या बदललेल्या रचनेवरून ,ठळकपणे वेगळे दिसणाऱ्या, मध्यम प्रकारे वेगळ्या दिसणाऱ्या, पुसटपणे दिसणाऱ्या पेशींच्या रचना ब्रॉडरच्या हिस्टोपॅथोलॉजीकल प्रणालीत हा फरक आढळून येतो. या कर्करोगात होणारे पेशींच्या रचनेतील बदल हे बरेचदा मानवी डोळ्यांना दिसून येणे दुरापास्त होते. पेशींच्या सारखेपणामुळे ह्या कर्करोगातील पेशींचे वर्गीकरण करून त्याची प्रतवारी करणे पेशीविकृतीतज्ञ  डॉक्टरांनादेखील कठीण असते कृत्रिम बुध्दीमत्तेच्या तंत्रज्ञानातील विकासामुळे संगणकाच्या आधारे डिजीटल प्रतिमा तयार करणे सहजसाध्य झाले असून याचाच उपयोग करून कर्करोगावर वेळेवर, विविध प्रकारची गुणकारी उपाययोजना करणे शक्य झाले असून त्यामुळे पॅथॉलॉजिस्ट यांच्यावरील भार कमी होऊन या रोगाचा मुकाबला करता येईल. 

प्रकाशन लिंक: https://doi.org/10.1016/j.neunet.2020.05.003

अधिक माहितीसाठी संपर्क- डॉ लिपी बी महंता (lbmahanta@iasst.gov.in )

****

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630134) Visitor Counter : 234