रसायन आणि खते मंत्रालय

व्ही. एन दत्त यांनी स्विकारली नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी

Posted On: 03 JUN 2020 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2020


श्री.विरेंद्र नाथ, नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडचे पणन व्यवस्थापक यांनी आज कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अधीभार स्विकारला. ते ऑक्टोबर 2018 सालापासून या कंपनीचे संचालक( पणन )म्हणून कार्यरत आहेत.

श्री.दत्त यांना, खत कंपनी व्यतिरीक्त, भारतीय वायु प्राधिकरण लिमिटेड (गेल), तेल आणि नैसर्गिक वायु प्राधिकरण (ओएनजीसी) यासारख्या सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. एनएफएल मध्ये रुजू होण्यापूर्वी ते  गेलचे कार्यकारी संचालक होते. तेथे त्यांनी पणन व्यवस्धापनासह, सांघिक व्यवहार, नियोजन यांची धुरा समर्थपणे सांभाळली. तसेच ते मुंबईतील महानगर गॅस कंपनीचे संचालकही होते. 1995  गेलचा पदभार स्विकारण्यापूर्वी 10 वर्षे  त्यांनी ओएनजीसीचे काम पाहिले.

एनएफएलचे पणन संचालक म्हणून रुजू झाल्यापासून कंपनीच्या खतांच्या विक्रीत 2017-18च्या 43 लाख मेट्रीक टनपासून ते 2019-20 57 लाख मेट्रीक टन  इतकी सतत वृध्दी होऊन दोन वर्षात विक्रीत 32% वाढ होण्याचे श्रेय त्यांना जाते. या कालावधीत एनएफएलने संपूर्ण देशभरात आपला ठसा उमटवला.

 

* * *

M.Jaitly/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1629064) Visitor Counter : 59