माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्र्यांची चित्रपट निर्माते, चित्रपट प्रदर्शक संघटना आणि चित्रपट उद्योगातील प्रतिनिधींसोबत बैठक
Posted On:
02 JUN 2020 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2020
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज चित्रपट निर्माते, चित्रपट प्रदर्शक संघटना आणि चित्रपट उद्योग प्रतिनिधी यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेतली. कोविड-19 मुळे चित्रपट उद्योगाला भेडसावणाऱ्या अडचणींबद्दल चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी ही बैठक आयोजित केली होती, याआधी चित्रपट उद्योगाकडून यासंदर्भात मंत्र्यांना निवेदने पाठविली होती.
केवळ सिनेमा हॉलच्या तिकिटांच्या विक्रीतून दररोज सुमारे 30 कोटी रुपयांचे उत्पन्न देणारे संपूर्ण देशभरात 9,500 स्क्रीन असल्याबद्दल मंत्र्यांनी उपस्थितांचे कौतुक केले. उद्योगाच्या विशिष्ट मागण्यांबद्दल चर्चा करताना जावडेकर म्हणाले की, उद्योगाकडून पगार अनुदान, तीन वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज, कर व शुल्कात सूट, विजेवरील किमान मागणी शुल्क माफी आणि औद्योगिक दराने वीज यासारख्या आर्थिक सवलतींची अधिक मागणी करण्यात आली आहे. या मुद्यांवर योग्य ते निर्णय घेण्यासाठी संबंधीत मंत्रालयांसोबत चर्चा केली जाईल असे आश्वासन यावेळी मंत्र्यांनी उपस्थित प्रतिनिधींना दिले.
निर्मिती संबंधित उपक्रम पुन्हा सुरू करण्याच्या मुद्यावर मंत्री म्हणाले की सरकारकडून प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली जात आहे.सिनेमा हॉल सुरू करण्याच्या मागणी संदर्भात मंत्री यांनी प्रतिनिधींना सांगितले की जून महिन्यात कोविड-19 साथीच्या आजाराची स्थिती पाहिल्यानंतर याचे परीक्षण केले जाईल.
B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1628836)
Visitor Counter : 275