रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

मोटार कॅब-मोटार सायकल भाडेतत्वावर देण्याच्या योजनेसाठी रस्ते मंत्रालयाकडून मार्गदर्शक सल्ले -सूचना जारी

प्रविष्टि तिथि: 01 JUN 2020 8:30PM by PIB Mumbai

 

मोटार कॅब किंवा मोटार सायकल भाडेतत्वावर देताना संबंधित लोकांनी  कोणकोणत्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे, याविषयी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आज दि. 1 जून, 2020 रोजी एक मार्गदर्शक सल्ला-सूचनांचे पत्रक No RT-11036/09/2020-MVL(pt-1) जारी केले आहे. यानुसार संबंधितांनी या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

अ. जर एखादी व्यक्ती व्यावसायिक वाहन चालवत असेल तर त्याच्याकडे वैध वाहन चालन परवाना -आयडीपी आणि संबंधित योजनेनुसार भाड्याने घेतलेल्या मोटार कॅबच्या भाडे परवान्याची प्रत (फॉर्म 3-4 ) किंवा मोटार सायकल भाड्याने घेतली असेल तर (फॉर्म 2) हे दस्तऐवज असतील तर त्या व्यक्तीकडे कोणत्याही बॅजसाठी आग्रह धरला जावू नये.

ब. ‘‘भाड्याने-मोटारसायकल योजना’’ लागू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी संबंधित योजना चालकांना नियमानुसार परवाने देण्याबाबत विचार करण्यात येईल.

क. यापुढे, ‘‘भाड्याने-मोटारसायकल योजना’’ यामध्ये परवाना असलेल्या दुचाकीधारकाला संबंधित कर भरल्यानंतर ते वाहन राज्यभर चालविण्यास परवानगी देण्यात येईल.

या संदर्भात मंत्रालयाच्यावतीने एसओ 437 (ई) दि. 12.06.1989 मधील तरतुदींनुसार ‘‘भाड्याने कॅब योजना’’ आणि एसओ 375 (ई) दि. 12.05.1997 मधील तरतुदींनुसार ‘‘भाड्याने मोटारसायकल’’ योजना तयार करून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार भाड्याच्या वाहनांचा वापर टॅक्सी सेवेप्रमाणेच पर्यटक, कॉर्पोरेट अधिकारी, व्यावसायिक प्रवासी आणि सुट्टीमध्ये फिरायला जाणा-या परिवारांकडून केला जात आहे.

***

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1628424) आगंतुक पटल : 370
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil , Telugu