संरक्षण मंत्रालय

पश्चिम नौदल कमांड येथे अतिनील निर्जंतुकीकरण सुविधा केली विकसित

Posted On: 28 MAY 2020 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मे 2020


जेव्हा आपण अंशतः आणि शेवटी पूर्ण लॉकडाऊन उठवणार आहोत, त्याआधीच "नवीन सामान्य" जीवन कसे असेल याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, विशेषत: डॉकयार्ड्स आणि इतर नौदल प्रतिष्ठानांसारख्या मोठ्या उत्पादन संस्था जिथे लॉकडाऊन उठल्यानंतर मोठ्या संख्येने कामगार पुन्हा कामावर रुजू होतील आणि ही संख्या हळूहळू वाढेल अशी अपेक्षा आहे. यामुळे कामगारांचे कव्हरऑल, उपकरणे, वैयक्तिक साधने (गॅझेट्स)  आणि मास्क यांच्या स्वच्छतेची जोरदार गरज निर्माण झाली आहे. 

ही उदयोन्मुख गरजा पूर्ण करण्यासाठी नौदल डॉकयार्ड (मुंबई) यांनी एक अतिनील स्वच्छता बे (UV sanitisation bay) तयार केले आहे. या अतिनील उपकरणाचा उपयोग कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी साधने, कपडे आणि इतर विविध वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी केला जाईल. अतिनील-सी (UV-C) प्रकाशयोजनेसाठी एल्युमिनियम शीट्सच्या विद्युतीय व्यवस्थेच्या बनावटीद्वारे एका मोठ्या सामान्य खोलीचे अतिनील बे मध्ये रूपांतर करणे हे एक मोठे आव्हानात्मक कार्य होते. 

ही सुविधा ज्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करायचे आहे त्यांच्याकडे अतिनील-किरणोत्सर्गासाठी अतिनील-सी प्रकाश स्रोत वापरते. नामांकित संशोधन संस्थाच्या अभ्यासानुसार यूव्ही-सी चा परिणाम सार्स (एसएआरएस), इन्फ्लूएंझा इत्यादी श्वसन रोगकारकांवर परिणामकारक रित्या सिद्ध झाला आहे. असे निदर्शनास आले आहे की सूक्ष्मजीव जंतू जेव्हा 1 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी 1 जी / सेमी 2 तीव्रतेच्या अतिनील-सीच्या संपर्कात येतात तेव्हा ते कमी व्यवहार्य होतात, हे एक प्रभावी निर्जंतुकीकरण असल्याचे निदर्शनास आले आहे. 

नौदल स्थानक (कारंजा) येथे देखील अशीच सुविधा स्थापित करण्यात आली आहे, जेथे अतिनील-सी स्टरलाइझर व्यतिरिक्त, एक औद्योगिक ओव्हन देखील ठेवण्यात आला आहे, जो कमीतकमी 60 अंश सेल्सिअस तापमानात गरम होते, बहुतांश सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठीचे हे एक योग्य तापमान आहे.

ही सुविधा आगमन/निर्गमन ठिकाणी ठेवण्यात आली असून यामुळे  कोविड-19 चा प्रसार कमी करण्यास मदत होईल. 


* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1627525) Visitor Counter : 264