भारतीय स्पर्धा आयोग

नुवोको विस्ताज कॉर्पोरेशन लिमिटेडकडून इमामी सिमेंट लिमिटेडच्या अधिग्रहणाला 'सीसीआय'ची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 21 MAY 2020 11:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मे 2020

 

नुवोको विस्ताज कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (NVCL) इमामी सिमेंट लिमिटेडच्या (ECL) अधिग्रहणाला सीसीआयने (भारतीय स्पर्धा आयोगाने) मंजुरी दिली आहे. 

'एनव्हीसीएल' ही निरमा प्रवर्तक ग्रुपची कंपनी आहे. छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान व हरियाणा या राज्यांमध्ये सध्या कंपनीची निर्मिती एकके आहेत. ग्रे सिमेंटच्या विविध उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्री क्षेत्रातली ही कंपनी आहे. बांधकामासाठी लागणारी काही रसायने, पुट्टी, कव्हर ब्लॉक्स अशा इतर मूल्यवर्धित उत्पादनांची विक्री  देखील कंपनी करते. 

'ईसीएल' ही इमामी ग्रुपचा भाग असून पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार व ओडिशा या राज्यांमध्ये कंपनीची निर्मिती एकके आहेत. ग्रे सिमेंटच्या विविध उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्री क्षेत्रातली ही कंपनी आहे.

 

* * *

S.Pophale/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1626022) आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu