वित्त आयोग

'वित्तीय एकत्रीकरण पथदर्शी' वरील 15 व्या वित्त आयोगाच्या समितीची पहिली बैठक उद्या होणार

Posted On: 20 MAY 2020 4:35PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 मे 2020

 

'वित्तीय एकत्रीकरण पथदर्शी' वरील 15 व्या वित्त आयोगाच्या समितीची पहिली बैठक उद्या 21 मे 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे.

15 व्या वित्त आयोगाच्या (एक्सव्हीएफएस) विचारार्थ विषयांमधील एक विषय (टीओआरएस) म्हणजे, समानता, क्षमता आणि पारदर्शकता तत्वाद्वारे मार्गदर्शित समावेशक विकासाला चालना देताना कर्ज आणि तुटीच्या योग्य स्तराचे पालन करताना आपल्या जबाबदारी लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारांच्या वित्तीय एकत्रीकरण पथदर्शी  शिफारशी तयार करणे. या टीओआरच्या अनुषंगाने, एक्सव्हीएफसीने 18 मार्च 2020 रोजी एक्सव्हीएफएसचे  अध्यक्ष एन के सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य सरकारच्या वित्तीय एकत्रीकरण पथदर्शीचा आढावा घेण्यासाठी एक समिती गठीत केली.

वर्ष 2020-21 साठीच्या एक्सव्हीएफसीच्या अहवालावर केंद्र सरकारकडून यापूर्वीच कारवाई करण्यात आली आहे. उपरोक्त टीओआर अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाकडे 2021-22 ते 2025-26 या कालावधीत सर्वसाधारण सरकारचा वित्तीय एकत्रीकरण पथदर्शी तयार करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. साथीच्या रोगाचा प्रदुर्भाव आणि केंद्र व राज्य सरकारांवर असलेल्या एकत्रित आर्थिक सक्तीमुळे हे कार्य अधिक क्लिष्ट झाले आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने आधीपासून उपलब्ध असलेल्या 3 टक्क्यांव्यतिरिक्त राज्य सरकारांना सकल राष्ट्रीय उत्पनाच्या 2 टक्के एवढे अतिरिक्त कर्ज घेण्याला परवानगी दिली आहे. 

उदयोन्मुख वित्तीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढे जाण्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी उद्या उपरोक्त समितीची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या एन के सिंह (अध्यक्ष); अजय नारायण झा व डॉ. अनूप सिंह (15 व्या वित्त समितीचे सदस्य); डॉ. कृष्णमूर्ति सुब्रमण्यन, मुख्य आर्थिक सल्लागार; सोमा रॉय बर्मन, लेखा महानियंत्रक; रजत कुमार मिश्रा, वित्त मंत्रालयात संयुक्त सचिव; एस कृष्णन, तामिळनाडू सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव; संस्कृत तिवारी, पंजाब सरकारचे सचिव आणि डॉ. सज्जीद झेड चिनॉय आणि डॉ. प्राची मिश्र प्रख्यात विश्लेषक या बैठकीत भाग घेण्याची शक्यता आहे.

******

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625566) Visitor Counter : 161