सांस्कृतिक मंत्रालय

सांस्कृतिक मंत्रालयाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने नवोदित कलाकार, विद्यार्थी आणि नाट्य रसिकांसाठी 10-17 मे 2020 दरम्यान नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांकडून वेबिनारचे आयोजन

Posted On: 08 MAY 2020 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8  मे 2020

कोविड -19 मुळे लागू राष्ट्रीय लॉकडाऊन दरम्यान सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने (एनएसडी)  10 मे 2020 पासून एक आठवडाभर दररोज नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांद्वारा वेबिनारचे आयोजन केले आहे. इच्छुक लोक एनएसडीच्या यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजवर या वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकतात. दररोज एक तासाचे हे वेबिनार संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल आणि लोकांना प्रश्न-उत्तरासाठी 30 मिनिटे अतिरिक्त मिळतील. वेबिनारमध्ये  केवळ थिएटरच्या इतिहासावर आणि समीक्षेवरच नव्हे तर डिजिटल माध्यमातून व्यावहारिक प्रशिक्षण देण्यावर देखील भर दिला जाणार आहे.

व्याख्याने, लेक-डेम, मास्टर क्लास, नाट्य आणि इतर कला क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींशी संवाद तसेच भारतीय रंगभूमीच्या महान कलाकारांबरोबर सखोल चर्चा यांचा यात समावेश असेल. सध्याच्या क्षणी  या मर्यादित आणि मध्यवर्ती संवादामुळे लाखो लोकांची शिकण्याची लालसाच  केवळ पूर्ण होणार नाही तर संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी एक संसाधन सामग्री देखील उपलब्ध होईल.

इच्छुक लोक https://www.youtube.com/c/nationalschoolofdramaवर वेबिनारमध्ये सहभागी  होऊ शकतात

वेबिनार एनएसडीच्या अधिकृत https://www.facebook.com/nsdnewdelhi/फेसबुक पेजवर देखील थेट उपलब्ध असेल.

देशातील काना -कोपऱ्यातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे त्यांच्या घरगुती क्षेत्रापर्यंतच सीमित आहेत आणि नियमित थिएटरच्या अभ्यासाच्या संपर्कात नाहीत अशांसाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने हा  उपक्रम आखला आहे. हा अभ्यासक्रम केवळ थिएटर करणाऱ्यांसाठी नाही तर आपल्या अनुभवाची क्षितिजे विस्तारण्यासाठी मानवी आणि कलात्मक संवादाची आवश्यकता असलेल्या सर्व लोकांसाठी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सर्वांसाठी आहे.

वेबिनार सुरू करण्याच्या योजनेबद्दल बोलताना राष्ट्रीय नाट्य विद्यालयचे  प्रभारी संचालक प्रा. सुरेश शर्मा म्हणाले, सध्या सुरू असलेल्या या साथीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला असे वाटते की कलाकारांना कला साकारण्याची संधी मिळाली नसल्यामुळे ते खूप निराश झाले आहेत. आपल्या सर्वांना माहितच आहे की थिएटरची कला ही सामुहिकपणे करण्याचे काम आहे. पण सध्याच्या परिस्थितीमुळे हे अशक्य झाले आहे.राष्ट्रीय नाट्य विद्यालयने एक ऑनलाइन व्यासपीठ सुरू केले आहे जिथे घरी बसलेले लोक आमच्याशी संपर्क साधू शकतील आणि ज्ञान मिळवण्यासाठी वेळेचा सदुपयोग करतील. हे केवळ त्यांची कौशल्ये वाढविण्यासाठी नव्हे तर या साथीच्या रोगाने निर्माण झालेल्या मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल.

नवीन मार्ग अवलंबण्याबरोबरच आपल्या कलाकारांच्या समुदायाबद्दलही चिंता वाटत होती. नेहमीच्या गजबजलेल्या आयुष्यातून एकदम घरात अनिश्चित काळ बंद राहण्यामुळे विद्यार्थ्यांसह अन्य उत्साही नाट्य कलाकारणमध्ये चिंतेचे वातावरण होते. हा ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत करेल.

वेबिनारचे वेळापत्रक

- 10 मे: प्रा.सुरेश शर्मा - नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अँड एनएसडी रिपर्टरी कंपनी

- 11 मे: प्रा . अभिलाष पिल्लई डिवाइज्ड थिएटर अँड  डिजिटेलिटी

- 12 मे: दिनेश खन्ना अभिनय करण्याचे तंत्र

- 13 मे: अब्दुल लतीफ खटाणा - थिएटरमध्ये मुलांसमवेत कार्यरत

-14 मे:  हेमा सिंग - बेसिक्स ऑफ स्पीच 

-15 मे: एस मनोहरन  थिएटरमधील ध्वनी आणि व्हिडिओ तंत्रज्ञान

-16 मे: सुमन वैद्य - उत्सव व्यवस्थापन

-17 मे: राजेश तैलंग -हिंदी आणि बिगर हिंदी बोलणाऱ्यांसाठी हिंदी भाषेची आव्हाने

 

 

M.Jaitly/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622407) Visitor Counter : 143