विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        जनजागृती आणि सज्जतेतून कोविड-19 वर मात : NCSTC-GUJCOST वेबिनार सिरीजचे आयोजन
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                07 MAY 2020 8:43PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 7 मे 2020
राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संवाद परिषद (NCSTC) आणि केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि गुजरात विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद (GUJCOST), यांनी संयुक्त विद्यमाने ‘कोविड-19 च्या काळात विज्ञान संवाद’ या विषयावर नागरिकांसाठी एक विज्ञान वेबिनार आयोजित केला आहे. 10 ते 16 मे दरम्यान रोज सकाळी 10 ते 11 या वेळेत ही वेबिनार मालिका होणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून, ही ऑनलाईन वेबिनार मालिका लोकांना बघता येईल.

विविध पद्धती आणि साधने वापरुन कोविड19 वर कशी मात करता येईल, यावर या वेबिनारमध्ये माहिती सांगितली जाईल. कोविड च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जागृती आणि सज्जता कशी असावी यावर यात मार्गदर्शन केले जाईल.
या आव्हानाचा सामना करण्यासाठी आवश्यक ती कृती आणि सज्जता कशी असावी, त्याची माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी यात विविध हितसंबंधीय, विद्यार्थी, शिक्षणतज्ञ, माध्यमे, स्वयंसेवक यांचा सहभाग असेल.
खऱ्या शास्त्रीय माहितीच्या आधारे, सोप्या भाषेत आरोग्यविषयक सूचना आणि माहिती प्रभावीपणे समाजापर्यंत पोचवून विज्ञानाचा प्रसार करण्यात या वेबिनारची मदत होईल.
* * *
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1621935)
                Visitor Counter : 204