गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

नाशिक स्मार्ट सिटीच्या मोबाईल ऐप आणि बॉडी सॅनिटायझेशन मशीन्स सारख्या उपक्रमांमुळे शहराच्या कोविड-19 च्या लढ्याला बळकटी

Posted On: 07 MAY 2020 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2020


कोविड-19 च्या लढ्यात नाशिक महानगरपालिकेने अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. शहरी स्तरावर राबवलेले काही उपक्रम खालीलप्रमाणे

स्वच्छता/सार्वजनिक स्थळांचे निर्जंतुकीकरण: आठ ट्रक्टरच्या मदतीने रस्त्यांवर सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी, आणि 13 पंपांच्या मदतीने पालिकेची विविध कार्यालये, विलगीकरण कक्ष आणि शहरभर फवारणी, मलेरियाप्रबंधानासाठी देखील संपूर्ण शहरात फवारणी.

घनकचरा संकलन आणि विलगीकरण केलेल्या घरातील कचरा संकलनासाठी वेगवेगळी वाहने घरोघरी जाऊन कचरा संकलन करताना, पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी घरे आणि विलगीकरण केलेल्या घरांसाठी वेगवेगळी वाहने वापरण्याची काळजी घेतली.

सफाई कर्मचाऱ्यासाठी विशेष पीपीई सूट्सची व्यवस्था – सफाई कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरणे जसे की हातमोजे, मास्क, सॅनीटायझर यांची आणि 748 वैद्यकीय अधिकारी तसेच 1500 सफाई कर्मचाऱ्यांसाठी PPE सूट्सची व्यवस्था करण्यात आली.

संस्थात्मक विलगीकरण वार्डच्या सुविधेची उपलब्धता :- शहरभरात कोविड-19 च्या संशयितांसाठी 14 संस्थात्मक विलगीकरण वार्डचे नियोजन आणि सुविधा करण्यात आली होती. त्यापैकी 72 खाटांचा आजपर्यंत उपयोग करण्यात आला आहे.   

सील केलेल्या क्षेत्रात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्याकडून चाचण्या :- डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कृती गटाची 22, 12 आणि 11 पथके शहराच्या विविध भागात तैनात करण्यात आली होती. आतापर्यंत सील झालेल्या क्षेत्रात 8000 नागरिकांची आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे.

स्मार्टफोन ऐप “महाकवच” :

‘महाकवच’ या डिजिटल ऐपमुळे नागरिकांना रियल टाईममध्ये संपर्क ट्रेसिंग, मैपिंग आणि विलगीकरणात असलेल्या कोविड19 च्या रुग्णांचे ट्रेकिंग करणे शक्य आहे. याचा ऐप मध्ये सेल्फी उपस्थिती देखील लावता येते. डॉक्टर्स आणि आरोग्य कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोणीही व्यक्ती या ऐपचा वापर करु शकतात.  त्याशिवाय इतर अनेक फीचर्स देखील या ऐप मध्ये आहेत.

‘नाशिक बाजार’ स्मार्टफोन ऐप:  लॉकडाऊनच्या काळात जनतेला आवश्यक वस्तूंची ऑनलाईन मागणी करता यावी तसेच त्याना घरपोच वस्तूंचा पुरवठा व्हावा, यासाठी नाशिक महानगरपालिका आणि महारष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एंड अग्रीकल्चर  यांनी मिळून ‘नाशिक बाजार’ हे ऐप विकसित केले आहे. आतापर्यंत 902 ग्राहक आणि  332 पुरवठादारांनी या ऐपवर नोंदणी केली आहे.  

स्मार्टफोन ऐप ‘NMC कोविड-19 : या ऐपमधून लोकांना 11 प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. कोरोनाशी संबंधित सर्व माहिती, मार्गदर्शन त्याशिवाय किराणा आणि इतर दुकाने, अन्नदानासाठी नोंदणी, अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठीची माहिती, निवारा केंद्रे इत्यादी सेवा यावरून पोचवल्या जातात.  आतापर्यंत 700 हून अधिक नागरिकांनी हे ऐप डाऊनलोड केले आहे.

VMD आणि PAS च्या माध्यमातून सामाजिक जागृती:  विविध मेसेज, चित्रे आणि सार्वजनिक संदेश व्यवस्थेमार्फत दररोज कोरोनाविषयक जनजागृती केली जाते. कोविडची लक्षणे, काळजी आणि हेल्पलाईन क्रमांक सांगितले जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी या सूचना वारंवार लावल्या जातात.

IVR आधारित 24*7 मदतकक्ष: जनतेला कोविड 19 ची माहिती देण्यासाठी त्यांच्या फोनवर आवाजी अथवा लिखित मेसेज पाठवले जातात. आजवर 4,50,000 नागरिकांना हे मेसेज पाठवण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी हेल्पलाईन आहे.  

एकात्मिक नियंत्रण कक्ष: - एकात्मिक नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून वेब आणि मोबाईल आधारित कोविड ऐप वर सतत देखरेख ठेवली जाते.

बॉडी सॅनिटायझिंग मशीन  :  नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयात, विभागीय कार्यालयात आणि इतर रुग्णालयांमध्ये बॉडी सॅनिटायझिंग मशीन  लावण्यात आल्या आहेत.

एरोसोल बॉक्स  : एरोसोल बॉक्स  आणि एरोसोल इंत्यूबेशन बॉक्सच्या मदतीने संशयित रुग्णाचे स्वेब नमुने घेतले जातात, त्यामुळे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे संरक्षण होते

कोविड19 विषयक दारोदार सर्वेक्षण, सामाजिक जागृती आणि तपासणीचे काम परिचारिका आणि आशा कार्यकर्त्या करत आहेत.  

कोविड-19 आरोग्य सर्वेक्षण प्रश्नावली – कोरोनाची लक्षणे आणि नागरीकांची इतर माहिती संकलित करण्यासाठी कोविड-19 आरोग्य सर्वेक्षण प्रश्नावली भरून घेतली जात आहे.

फळे आणि भाजीपाला बाजारांचे विकेंद्रीकरण : नाशिक महानगर पालिकेने विविध ठिकाणी  106 भाजी आणि फळबाजार लावले असून त्यामुळे सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन केले जात आहे.

शेतकरी गट आणि स्वयंसेवी संस्थांची मदत: शहरात 82 विविध ठिकाणी शेतकऱ्याचे 42 गट बनवण्यात आले असून विविध संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांचा कृषी माल थेट ग्राहकांपर्यंत पोचवला जात आहे.

डॉक्टर आपल्या दारी, फिरता दवाखाना : या उपक्रमाअंतर्गत शहरातील सहा विभागांच्या झोपडपट्ट्यांमध्ये वैद्यकीय सेवा दिली जात आहे.

निवारा केंद्रांची व्यवस्था : नाशिक महानगरपालिकेने स्थलांतरित मजुरांसाठी आणि इतर गरीब लोकांसाठी वार्डनिहाय निवारा केंद्रे बनवली आहे. या निवारा केंद्रात सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621928) Visitor Counter : 187