सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
आयआयटी-मद्रास सोबत कॉयरवर संशोधन आणि विकासासाठी कॉयर बोर्डाचा पुढाकार
कॉयर बोर्ड आणि आयआयटी-मद्रासमध्ये उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याविषयी परस्पर सामंजस्य करार
Posted On:
07 MAY 2020 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2020
कॉयर बोर्डाने आयआयटी-मद्राससोबत काथ्या आणि इतर तंतुंचा वापर करण्यासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याविषयी परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. केंद्रीय लघु, मध्यम आणि सूक्ष्म खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने, आयआयटी मद्रासने या आधीच कॉयर बोर्डाने केलेल्या संशोधन अभ्यासाला प्रमाणित केले आहे आणि शिफारस केली आहे की, उतारावरील जमीनीची धूप रोखणे, नदीवरील बंधारे, खाणींचे उतार यांचे स्थिरीकरण करण्यासाठी कॉयर जिओ-टेक्सटाईल्सचा यशस्वीरित्या वापर होऊ शकतो. संस्थेने कॉयर जिओ-टेक्सटाईल्स कमी प्रमाणात रस्त्याच्या कामासाठी वापरता येऊ शकते, अशीही शिफारस केली आहे.
या नव्या उत्कृष्टता केंद्राचा उद्देश आयआयटी मद्रासमधील तज्ज्ञांच्या मदतीने काथ्या क्षेत्रातील आतापर्यंतच्या संशोधनाचा विस्तार करणे हा आहे. उत्पादन आणि प्रक्रियेसाठी विशिष्ट प्रकल्पासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आणि कॉयर मंडळाच्या संशोधन संस्था/ मंडळ यांचे सल्लागार व मदतनीस म्हणून काम करणे. उत्कृष्टता केंद्र बौद्धिक मालमत्ता अधिकार आणि तंत्रज्ञान हस्तांतरणातही मदत करेल.
कॉयर मंडळ उत्कृष्टता केंद्राची स्थापना आणि केंद्र चालवण्यासाठी सुरुवातीला 5 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करेल.
कॉयर उद्योगाच्या 27 क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकास विषयक कामे उत्कृष्टता केंद्राकडून केली जाणार आहेत, या व्यतिरिक्त आयआयटी मद्रासच्या मशिनरी विकास आणि रस्ते प्रकल्पावरील 10 संशोधन प्रकल्पांचाही यात समावेश आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621883)
Visitor Counter : 160