पंतप्रधान कार्यालय

आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा

Posted On: 14 APR 2020 12:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘‘बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांच्या वतीने त्यांना विनम्र श्रध्दांजली’’असं पंतप्रधान म्हणाले.

                              

बाबासाहेब डॉ. भीमराव अम्बेडकर को उनकी जयंती पर सभी देशवासियों की ओर से विनम्र श्रद्धांजलि। #AmbedkarJayanti pic.twitter.com/ddDiD8HAe5

— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2020

( पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली, त्यामध्ये असलेल्या त्यांच्या व्हिडिओचा हा अनुवाद आहे.)

‘‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. बाबासाहेब मानवतेसाठीच जगले. ज्या ज्या गोष्टी अमानवीय होत्या, त्या त्या सर्व गोष्टी ते नाकारत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वांतत्र्यानंतरच्या भारतासाठी नवनवीन नीती दिल्या होत्या. नवीन दृष्टीकोण दिला होता.  बाबासाहेबांच्या विचारधारेच्या मुळामध्ये अनेक समानता अनेक रुपांनी समाविष्ट झालेली होती. सन्मान देण्याची समानता, कायद्याची समानता, अधिकाराची समानता, मानवीय गरिमा राखण्याची समानता, संधीची समानता... अशा कितीतरी विषयांमध्ये बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्यांच्या व्याख्या निश्चित केल्या. आणि विषयांच्या मुद्यांवर सतत चर्चा केली. अशा महापुरूषांचे चिंतन म्हणजे आपल्याला प्रेरणा देणारे आहे. आपल्याला ताकद देणारे आहे. आज जयंतीनिमित्त, मी बाबासाहेब आंबेडकरांचे करतो. त्यांना नमन करतो. ’’

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1614224) Visitor Counter : 98