उपराष्ट्रपती कार्यालय

भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला लोकांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 05 APR 2020 3:45PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020

 

आपल्या संदेशामध्ये त्यांनी भगवान महावीर यांना विश्वातील सर्वात तेजस्वी आध्यात्मिक नेते म्हणून संबोधले आणि कोविड-19च्या संकटकाळात लोकांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यास सांगितले आहे.

 

संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे -

" 'महावीर जयंती'च्या शुभ मुहूर्तावर मी आपल्या देशातील जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.

भगवान महावीर, जगाच्या पाठीवर उदय झालेल्या सर्वात तेजस्वी आणि प्रभावी आध्यात्मिक नेत्यांपैकी एक होते. अहिंसा, सत्य, प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा आणि त्याग  याबाबत दिलेले त्यांचे संदेश शाश्वत आणि वैश्विक करुणेने भरलेले आहेत. त्यांनी सार्वाभूती प्रेमाची दिक्षा दिली आणि यावर जोर दिला की वनस्पती असो वा प्राणी, सर्वच समान आहेत आणि प्रेम व आदराचे अधिकारी आहेत.

आज आपण कोविड-19 सारख्या संसर्गाला समोरे जात असताना भगवान महावीरांचे जीवन, त्यांची निस्पृहता, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा आग्रह, प्रेम, सहिष्णुता आणि शांती यांचे संदेश, यातून प्रेरणा व समज घेतली पाहिजे.

या भीषण आव्हानाला तोंड देत असताना, संपूर्ण जगाचे रक्षण आणि आरोग्य राखण्यासाठी आपण केवळ एकट्याने नव्हे तर एकत्र राहून प्रयत्न केले पाहिजेत.

या संकटाच्या घातक परिणामांवर मात करण्यासाठी अशा लोकांची मदत करुयात जे आपल्यापेक्षा कमी नशीबवान आहेत. चला, आपण बंधुता आणि मानवतेचा संदेश देऊ. करुणा व सहानुभूतीद्वारे भगवान महावीर यांच्या प्रति आपली श्रद्धा व आस्था व्यक्त करु. "

 

G.Chippalkatti/S.Pophale/P.Kor


(Release ID: 1611419) अभ्यागत कक्ष : 137