आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
चेहरा आणि तोंड झाकण्यासाठी घरी बनवलेल्या संरक्षक मास्कच्या वापरासंबंधी सूचना
Posted On:
04 APR 2020 12:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल, 2020
- कोविड- 19 चा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छता अतिशय महत्वाचे आहेत याची आपल्याला जाणीव आहे. सामान्य जनतेसाठी घरी बनवण्यात आलेले मास्क लाभदायक असल्याचा दावा काही देशांनी केला आहे. वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी अशा प्रकारचे घरी बनवण्यात आलेले मास्क ही उत्तम पद्धत आहे. अशा प्रकारचा वापर एकूणच स्वच्छ आणि निरोगी आरोग्याचे वातावरण राखण्यास निश्चितच मदत करेल
- म्हणूनच असे सुचवण्यात आहे आहे की ज्या लोकांना कुठलाही आजार नाही किंवा श्वास घ्यायला त्रास होत नाही, त्यांनी विशेषत: घराबाहेर पडताना घरी बनवण्यात आलेल्या आणि पुन्हा वापरता येऊ शकेल अशा मास्कचा वापर करायला हरकत नाही. यामुळे समुदायाचे मोठ्या प्रमाणात संरक्षण करण्यात मदत होईल.
- आरोग्य कर्मचारी किंवा कोविड 19 रूग्णांच्या संपर्कात असलेले किंवा त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांसाठी तसेच जे स्वत: रुग्ण आहेत त्यांच्यासाठी याघरी बनवण्यात आलेल्या मास्कची शिफारस करण्यात आलेली नाही. या लोकांनी विशिष्ट संरक्षक मास्क घालणे आवश्यक आहे.
- घरी मास्क बनवताना दोन जोड बनवावेत जेणेकरून एक धुतला तर दुसरा वापरता येईल असा सल्ला देण्यात येत आहे. हात धुणे अजूनही आवश्यक निकष राहील आणि मास्क लावण्यापूर्वी देखील हात स्वच्छ धुवावेत. अशा प्रकारचे मास्क कुठेही फेकू नये, ते सुरक्षितपणे ठेवावेत, साबण आणि गरम पाण्याने व्यवस्थित धुवावेत आणि वापरण्यापूर्वी योग्य तऱ्हेने वाळवावेत.
- हे मास्क बनवताना घरी उपलब्ध असलेले स्वच्छ कापड वापरावे, आणि मास्क बनवण्यापूर्वी किंवा शिवण्यापूर्वी ते कापड स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तोंड आणि नाक पूर्णपणे झाकले जाईल आणि चेहऱ्यावर सहज बांधता येईल अशा प्रकाराचा मास्क घरी बनवावा.
- एकच मास्क कुटुंबातील सर्वांनी वापरू नये. एक मास्क केवळ एकाच व्यक्तीने वापरावा. अनेक सदस्य असलेल्या कुटुंबात प्रत्येक सदस्याचा स्वतंत्र मास्क असायला हवा.
अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा (मराठी)
For Detail Information Plz Click here (English)
R.Tidke/S.Kane/D.Rane
(Release ID: 1610979)
Visitor Counter : 335
Read this release in:
English
,
Kannada
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam