पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौ इथे ५ तारखेला होणाऱ्या संरक्षण प्रदर्शन २०२० चा उदघाटन समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार
Posted On:
03 FEB 2020 1:34PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथे येत्या ५ तारखेला होणाऱ्या संरक्षण प्रदर्शन २०२० चा उदघाटन समारंभ होणार आहे.
संरक्षणविषयक हे ११ वे द्विवार्षिक प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात १००० हुन अधिक राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून भारतातले हे सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन आहे.
'भारत - उगवते संरक्षण उत्पादन केंद्र ' ही या प्रदर्शनाची संकल्पना आहे. संरक्षण उत्पादनातले आघाडीचे तंत्रज्ञान एकाच छताखाली यावे आणि सरकारी, खाजगी उत्पादक आणि स्टार्ट अप्सना अधिक संधी मिळावी हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
संरक्षण विषयक डिजिटल परिवर्तन ही प्रदर्शनाची उपकल्पना आहे. या अंतर्गत नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगावर भर देण्यात येणार आहे.
उदघाटन समारंभानंतर पंतप्रधान इंडिया आणि उत्तर प्रदेशच्या दालनांना भेट देणार आहेत.
इंडिया दालनात, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, लघु आणि मध्यम उद्योगासह, सार्वजनिक खाजगी भागीदारीचे दर्शन घडणार आहे.
उत्तर प्रदेश दालनात राज्याचे औद्योगिक सामर्थ्य, आणि विशिष्ट संरक्षण कॉरिडॉरमध्ये गुंतवणुकीसाठी राज्यात असलेल्या अमाप संधी मांडण्यात येणार आहेत
संरक्षण प्रदर्शन २०२० मध्ये ७० हुन अधिक देश सहभागी होणार असून हे एक मोठे आंतर राष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन ठरणार आहे.
या प्रदर्शनात अनेक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.
***
(Release ID: 1601751)
Visitor Counter : 158
Read this release in:
Gujarati
,
Assamese
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Punjabi
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam