अर्थ मंत्रालय

मूडीज या पतमानांकन संस्थेच्या बदलत्या दृष्टीकोनावरील प्रतिक्रियेला वित्त मंत्रालयाने दिले उत्तर

Posted On: 08 NOV 2019 9:01AM by PIB Mumbai

भारत सरकारने नमूद केले आहे की मूडीज या पतमानांकन संस्थेने सरकारच्या परकीय आणि स्थानिक दीर्घ मुदती चलनावरील स्थिरतेचा दृष्टिकोन बदलून, नकारात्मकतेकडे कल असल्याचे सांगितले. या दोन्ही चलनाच्या जारीकर्त्याला मूडीजने Baa-2 पतमानांकन कायम ठेवले आहे

तथापि, जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत अजूनही कायम आहे, भारताची सापेक्ष स्थिती अबाधित आहे. असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणे निधी च्या अलीकडील आर्थिक सर्वेक्षणांत म्हटले आहे कि भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर, वर्ष 2019 मध्ये 6.1% ने वाढून तो वर्ष 2020 पर्यंत 7 % जाईल. भारताचा संभाव्य विकास दर यथावत राहिला आहे, आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि इतर बहुविध संस्थांनी भारताचा विकास सकारात्मकतेकडे असल्याचे म्हटले आहे.

B. Gokhale


(Release ID: 1590982) Visitor Counter : 224