मंत्रिमंडळ

भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान आरोग्य व वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबतच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 26 SEP 2018 4:07PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान आरोग्य तसेच वैद्यकीय विज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्यविषयक कराराला मंजुरी देण्यात आली. या करारानुसार पुढील क्षेत्रात सहकार्य अपेक्षित आहे.

1)     वैद्यकीय उपकरणे ज्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांमधल्या प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संशोधन उपकरणांचा आणि औषध निर्माण क्षेत्रातील उत्पादनांचा समावेश असेल अशा उपकरणांमध्ये व्यापार सहकार्य वाढवण्यासाठी संधींचा विस्तार.

2)    प्राथमिक आरोग्य सुविधा अधिक बळकट करणे आणि आरोग्य सुविधा व्यवस्था निर्माण करणे.

3)    या क्षेत्रातील संशोधन विकास तसेच अनुभवांचे आदान-प्रदान करणे

4)    टेलिमेडिसिन आणि इलेक्ट्रॉनिक्स आरोग्य माहिती यंत्रणा अशा क्षेत्रातील अनुभव आणि तंत्रज्ञानाची देवघेव

5)    प्रसूती आणि बाल आरोग्य संरक्षण

6)    संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वेक्षण, आजार नियंत्रण या दृष्टीने तंत्रज्ञान आणि धोरणात सुधारणा करण्याचे सहकार्य

7)    औषधे आणि औषध निर्माण क्षेत्रातील उत्पादनांचे नियमन

8)    परस्पर हिताच्या इतर संबंधित मुद्यांवर सहकार्य

या कराराच्या अंमलबजावणीसाठी एक कृती गट स्थापन केला जाईल.  

 ***

N.Sapre/R.Aghor/P.Malandkar



(Release ID: 1547452) Visitor Counter : 106