पंतप्रधान कार्यालय

इंदोर येथील आशरा मुबारक या इमाम हुसेन (एसए) यांच्या हौतात्म्य स्मरणोत्सव कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित ; उपस्थितांना संबोधन

Posted On: 14 SEP 2018 2:59PM by PIB Mumbai

Bhavana Gokhale mco.mum-pib[at]nic[dot]in via nic.in 

4:25 PM (3 minutes ago)
   
to regional, regionalpmowebsite, me
 
 
 
 
 

 

PM attends Ashara Mubaraka – commemoration of martyrdom of Imam Husain (SA) in Indore; addresses gathering

 

इंदोर येथील  आशरा  मुबारक या  इमाम हुसेन (एसए) यांच्या हौतात्म्य स्मरणोत्सव कार्यक्रमास  पंतप्रधान उपस्थित ; उपस्थितांना संबोधन

(Release ID: 1546115)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूर येथे  दाऊदी बोहरा समाजा तर्फे आयोजित इमाम हुसेन (एसए) यांच्या हौतात्म्य स्मरणोत्सव कार्यक्रम -अशारा मुबारक येथे उपस्थित राहून प्रचंड लोकसमुद्दयाला संबोधित केले.

इमाम हुसेन यांच्या बलिदानाबद्दल स्मरण करून देतांना पंतप्रधान म्हणाले की, शांतता आणि न्याय कायम ठेवण्यासाठी इमाम नेहमीच अन्याया  विरोधात उभे राहिले आणि  शहीदही  झाले . त्यांनी सांगितले की इमामची शिकवण आजही प्रचलित आहे. डॉ. सय्यदना मुफदाद सैफुद्दीन यांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, देशाबद्दल प्रेम आणि समर्पण हे त्यांच्या शिकवणींचे वैशिष्ट्य आहे.

अनेकांच्या  संस्कृतीसह वाटचाल हे  भारताचे  इतर देशांपेक्षा असलेले वेगळेपण आहे. " आम्हाला आमच्या इतिहासाबाबत अभिमान आहे, आम्ही वर्तमानावर विश्वास ठेवतो. आणि आम्हाला आमच्या  दैदिप्यमान भविष्याबद्दल विश्वास आहे.

दाऊदी बोहरा समाजाच्या योगदानावर प्रकाश टाकतांना पंतप्रधान म्हणाले की, या समुदायाने नेहमीच भारताच्या प्रगती आणि विकासाच्या गोष्टींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी आशा व्यक्त केली कीसंपूर्ण जगभरात भारताच्या संस्कृतीची ताकद वाढविण्याचे काम त्यांच्याकडे आहे.

बोहरा समाजाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला  बोहरा समाजाची आपुलकी मिळाली हे माझे सौभाग्य समजतो. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळात बोहरा  समाजाकडून मिळालेल्या सहाय्यांना स्मरण करुन मोदींनी सांगितले की या समाजाचे  प्रेम त्यांना इंदूरला आणते.

दाऊदी बोहरा समाजातील विविध सामाजिक पुढाकारांचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की गरीब व गरजू नागरिकांचे  जीवनमान सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. या संदर्भात, त्यांनी आयुष्मान भारत, स्वच्छ भारत अभियान आणि प्रधान मंत्री आवास योजनेसारख्या शासनाच्या विविध विकासात्मक पुढाकारांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, हा  पुढाकार सामान्य लोकांच्या जीवनातं  बदल घडवून आणत आहे.

पंतप्रधानांनी  इंदोर मधील लोकांचे  स्वच्छ भारत अभियानाच्या  प्रगतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी सांगितले कि,  'स्वच्छता ही  सेवा' योजना उद्या सुरु करण्यात येणार आहे आणि त्यांनी नागरिकांना या भव्य स्वच्छता  मोहीममध्ये सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले.

व्यवसायात बोहरा समाजाच्या प्रामाणिकपणाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी जीएसटी, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोडद्वारे प्रामाणिक व्यवसायकर्ते कामगारांना प्रोत्साहन दिले. ते म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे आणि नवीन भारताचे  क्षितिज व्यापक आहे.

या प्रसंगी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री शिवराजसिंह चौहानही उपस्थित होते. डॉ. सैयदना मुफदाद सैफुद्दीन यांनी  पंतप्रधानांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची  प्रशंसा केली आणि देशासाठी  ते करत असलेल्या  कार्यासाठी त्यांनी  शुभेच्छा दिल्या.

*****

B. Gokhale/DY



(Release ID: 1546144) Visitor Counter : 93