मंत्रिमंडळ

भारत आणि इजिप्त दरम्यान कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 12 SEP 2018 4:27PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि इजिप्त दरम्यान कृषी  आणि संलग्न क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करारावरील स्वाक्षरीला मंजुरी दिली.

या करारांतर्गत सहकार्याच्या क्षेत्रात कृषी पिके (विशेषतः गहू आणि मका) , कृषी जैव तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, जल संरक्षण आणि सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानासह सिंचन आणि जल व्यवस्थापन तंत्रज्ञान ,ऊर्जा उत्पादनासाठी कृषी कचरा व्यवस्थापन, अन्न सुरक्षा , सुरक्षा आणि  गुणवत्‍ता, बागायती , सेंद्रिय शेती  पशुपालन , दुग्धव्यवसाय , मत्‍स्‍य पालन, चारा उत्‍पादन, कृषि उत्‍पादन आणि मूल्‍यवर्धन, वनस्पती आणि  पशु उत्‍पादनांच्या व्यापारा संबंधित स्‍वच्‍छता ,  कृषि अवजारे आणि  उपकरण, कृषि व्यवसाय आणि विपणन, कापणीपूर्व आणि नंतरच्या प्रक्रिया , खाद्य तंत्रज्ञान आणि प्रसंस्‍करण,  कृ‍षि विस्‍तार आणि  ग्रामीण विकास, कृषि व्‍यापार आणि गुंतवणूक ,  बौद्धिक संपदा अधिकारसंबंधी मुद्दे आणि परस्पर हिताच्या सहमतीच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

संशोधन वैज्ञानिक आणि तज्ञांच्या आदान-प्रदान, कृषि संबंधी माहिती आणि वैज्ञानिक प्रकाशन(पत्र-पत्रिका, पुस्‍तके , बुलेटिन, कृषि आणि संलग्न क्षेत्रातील सांख्यिकी आकडेवारी ), जर्मप्‍लाज्‍म आणि कृषि तंत्रज्ञानाचे  आदान-प्रदान आणि चर्चासत्र , कार्यशाळा आणि अन्‍य घडामोडीच्या माध्यमातून सहकार्य प्रभावी बनवले जाईल.  

या करारांतर्गत एक संयुक्‍त कार्य गट (जेडब्‍ल्‍यूजी)स्थापन केला जाईल जेणेकरून द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा आणि परस्पर हिताच्या अन्य मुद्द्यांवर सहकार्य दृढ करता येईल. सुरुवातीच्या दोन वर्षात संयुक्‍त कार्य गटाची बैठक किमान वर्षभरात एकदा  (भारत आणि इजिप्तमध्ये )होईल. यात संयुक्‍त कार्यासाठी कार्यक्रम तयार करणे सुविधा आणि सल्ला पुरवणे आणि विशिष्ट मुद्द्यांसंदर्भात अतिरिक्‍त सहभाग आदी मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

Mahesh Chopade/S.Kane



(Release ID: 1545948) Visitor Counter : 163