|
1
|
परतावा यंत्रणेमध्ये कोणते प्रमुख बदल केले जात आहेत?
|
- व्यवसाय सुलभतेचा विस्तार करणे, पारदर्शकतेत सुधारणा घडवणे आणि करदात्यांवरील खेळत्या भांडवलाच्या गरजेचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने, परताव्यांचे दावे जलद गतीने निकाली काढले जावेत यासाठी, प्रणालीद्वारे केलेल्या जोखीम विश्लेषणाच्या आधारे विशिष्ट श्रेणींमधील परताव्याशी संबंधित दाव्यांवर कालबद्ध आणि स्वयंचलित प्रक्रियेअंतर्गत कार्यवाही करण्यासाठी, विद्यमान परतावा यंत्रणेत सुधारणा केली जात आहे. प्रणालीच्या सज्जतेला अनुसरून हे बदल 2 टप्प्यांत लागू केले जात आहेत.
- टप्पा I:
पोचपावती किंवा त्रुटी टिपण जारी करण्याची कालमर्यादा 15 दिवसांवरून कमी करून 10 दिवस केली जाईल. अधिकाऱ्याने 10 दिवसांत कोणतीही कारवाई न केल्यास, अर्जाची पोचपावती दिल्याचे मानले जाईल आणि प्रणालीद्वारेच पोचपावती दिली जाईल.
- शून्य दर पुरवठा किंवा व्यस्त शुल्क रचनेशी (Inverted Duty Structure) संबंधित पोचपावती जारी केलेल्या, कमी जोखीम असलेल्या परताव्याच्या दाव्यांसाठी, दावा केलेल्या परतावा रकमेच्या 90 टक्क्ये मर्यादेपर्यंतच्यास तात्पुरत्या परताव्याला प्रणालीद्वारे स्वयंचलित पद्धतीने मंजुरी दिली जाईल.
- इलेक्ट्रॉनिक रोख खातेवहीमधील कोणत्याही शिल्लक रकमेच्या परताव्याशी संबंधित दाव्याच्या बाबतीत, प्रणालीद्वारे अंतिम परताव्याला स्वयंचलित पद्धतीने मंजुरी दिली जाईल.
- टप्पा II:
परताव्याच्या अर्जातील माहितीची पडताळणी झाल्यानंतर, प्रणालीद्वारेच परताव्याच्या अर्जाची पोचपावती स्वयंचलित पद्धतीने दिली जाईल.
- काही तफावत आढळल्यास, त्रुटींचे निवारण करण्यासाठी आणि नवीन अर्ज दाखल करण्यासाठी, प्रणालीद्वारे करदात्याला संबंधित त्रुटींची माहिती कळवली जाईल. मात्र, पडताळणी अयशस्वी होण्याचा प्रकार पुन्हा घडल्यास, संबधित अर्जाच्या छाननी आणि प्रक्रियेकरता तो योग्य अधिकाऱ्याकडे पाठवला जाऊ शकतो.
- यासोबतच, कमी जोखीम असलेल्या शून्य दर पुरवठ्याच्या परतावा विषयक दाव्यांच्या बाबतीत, अंतिम परतावाही प्रणालीद्वारेच स्वयंचलितपद्धतीने दिला जाईल.
|
|
2
|
कोणत्या श्रेणीतील परतावे तात्पुरत्या स्वयंचलित परताव्यासाठी पात्र आहेत?
|
शून्य दर पुरवठा किंवा व्यस्त शुल्क रचनेशी संबंधित कमी जोखीम असलेल्या परताव्याच्या दाव्यांसाठी, न वापरलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC - Input Tax Credit) परतावा तात्पुरत्या स्वयंचलित परताव्यासाठी पात्र आहे.
|
|
3
|
तात्पुरता स्वयंचलित परतावा आधीच्या तात्पुरत्या परतावा प्रक्रियेपेक्षा कसा वेगळा आहे?
|
शून्य दर पुरवठा आणि व्यस्त शुल्क रचनेमुळे येणाऱ्या कमी जोखीम असलेल्या परताव्याच्या दाव्यांच्या बाबतीत, पोचपावती जारी झाल्यानंतर, कर अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपाशिवाय, प्रणालीद्वारे स्वयंचलित तत्त्वावर, दावा केलेल्या रकमेच्या 90 टक्के रक्कम तात्पुरत्या स्वरूपात मंजूर केली जाईल.
|
|
4
|
शून्य दर पुरवठा आणि व्यस्त शुल्क रचनेशी संबंधित परताव्याच्या दाव्यांच्या बाबतीत तात्पुरता परतावा मंजूर करण्यासाठी काही अपवाद आहेत का?
|
खाली नमूद केल्याप्रमाणे काही अपवाद आहेत:
- सुपारी, पान मसाला, तंबाखू आणि तंबाखुला पर्याय असलेल्या उत्पादित वस्तू, सुगंधी तेले यांसारख्या वस्तूंच्या पुरवठ्यात गुंतलेल्या व्यक्तींच्या काही अधिसूचित श्रेणी, तात्पुरत्या आधारावरील परताव्यासाठी पात्र नाहीत.
- ज्या कोणत्याही व्यक्तीने केंद्रीय वस्तू आणि सेवा कर नियम 2017 च्या नियम 10B अंतर्गत आधार प्रमाणीकरण केलेले नाही, ती व्यक्तीदेखील तात्पुरत्या आधारावरील परताव्यासाठी पात्र असणार नाही. अधिक तपशिलांसाठी कृपया 17.09.2025 रोजीची अधिसूचना क्रमांक 14/2025-केंद्रीय कर (14/2025–Central Tax) पाहावी.
- ज्या प्रकरणांमध्ये RFD-06 विरुद्ध DRC-01 जारी करण्यात आला आहे, किंवा जिथे संबंधित APL-04 शिवाय APL-03 दाखल केला गेला आहे, किंवा ज्या प्रकरणांमध्ये अपिलीय आदेशाविरुद्ध APL-07 दाखल केला गेला आहे, तसेच APL-04 जारी होणे अद्याप बाकी आहे, अशा प्रकरणांमध्ये निर्बंध लागू असतील. यामुळे तात्पुरता परतावा मंजूर करण्यापूर्वी अशी प्रकरणे योग्य तऱ्हेने छाननी व्हावी यासाठी पाठवली जातील याची सुनिश्चिती होईल.
|
|
5
|
व्यस्त शुल्क रचनेशी संबंधित परताव्याच्या दाव्यांवरील न वापरलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटच्या परताव्यावर काही निर्बंध आहेत का?
|
होय. दिनांक 28.06.2017 च्या अधिसूचना क्रमांक 5/2017-केंद्रीय कर (दर) (5/2017-Central Tax (Rate)) (सुधारणांसह) द्वारे अधिसूचित केलेल्या वस्तूंच्या बाबतीत व्यस्त शुल्क रचनेमुळे मिळणाऱ्या परताव्याला परवानगी दिली जाणार नाही.
यासोबतच, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या कलम 54 च्या उप कलम (10) आणि (11) नुसार, परतावा मंजुरीवरील वैधानिक निर्बंधही लागू असतील. याअंतर्गत इतर बाबींसोबतच, प्रणालीतील संबंधित घटकांची जोड देऊन, त्याद्वारे परतावा आदेश कोणत्याही अपिलाच्या किंवा इतर कार्यवाहीच्या अधीन असल्यास परतावा रोखून ठेवण्याची तरतूदही केली आहे.
|
|
6
|
परतावा अर्जावरील कार्यवाहीत अधिकाऱ्याची भूमिका काय असणार आहे?
|
टप्पा I अंतर्गत, अधिकारी संबंधित अर्ज मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत तो पूरीपूर्ण आहे की नाही हे तपासून, त्या अर्जाची पोचपावती जारी करेल. दस्तऐवजांमध्ये काही तफावत आढळल्यास, दावा करणाऱ्या व्यक्तीला, अशा त्रुटींची माहिती नमूद असलेल्या नमुना RFD-03 मध्ये, संबंधित त्रुटी टिपण जारी केले जाऊ शकते. त्याचवेळी पोचपावती मिळाली असलेल्यांच्या प्रकरणांमध्ये, कमी जोखीम असलेले शून्य दर पुरवठा तसेच व्यस्त शुल्क रचनेशी संबंधित तात्पुरत्या परताव्यांना प्रणालीद्वारेच मंजुरी दिली जाईल. या परताव्यावरील अंतिम कार्यवाही आणि छाननी योग्य अधिकाऱ्याद्वारे केली जाईल.
तसेच, ज्या प्रकरणांमध्ये परताव्याचा दावा तात्पुरत्या परताव्यासाठी पात्र नाही, अशा प्रकरणांमध्ये परतावा अर्जांवरील कार्यवाही आणि छाननी योग्य अधिकाऱ्याद्वारे केली जाईल.
टप्पा II अंतर्गत खाली नमूद प्रकरणे ही योग्य अधिकाऱ्याद्वारे हाताळली जातील:
- स्वयंचलित पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी प्रणालीने ज्या दाव्यांची निवड केलेली नाही, अशा परताव्याच्या दाव्यांवर कार्यवाही करणे.
- दावा केलेल्या रकमेच्या 90 टक्क्यांपर्यंतच्या मर्यादेत तात्पुरत्या परताव्याला प्रणालीद्वारे मंजुरी दिल्याल्यानंतर, व्यस्त शुल्क रचनेशी संबंधित परताव्यांच्या बाबतीत, परताव्याच्या दाव्यांची अंतिम छाननी करणे.
|
|
7
|
परताव्याचा अर्ज कमी जोखीमीच्या श्रेणीतील असला, तरी देखील योग्य अधिकारी तात्पुरता परतावा नाकारू शकतो का?
|
शून्य दर पुरवठा आणि व्यस्त शुल्क रचनेमुळे येणाऱ्या कमी जोखीम असलेल्या परताव्याच्या अर्जांच्या बाबतीत, दावा केलेल्या रकमेच्या 90 टक्के रक्कमेला प्रणालीद्वारे स्वयंचलित पद्धतीने तात्पुरत्या आधारावर मंजूरी दिली जाईल. ही प्रक्रिया पूर्णपणे प्रणालीद्वारे चालवली जाईल आणि या टप्प्यात अधिकाऱ्याचा कोणताही सहभाग असणार नाही.
|
|
8
|
तात्पुरता परतावा आदेश जारी करण्याची सुधारित कालमर्यादा काय आहे?
|
नमुना GST RFD-04 मधील तात्पुरता परतावा आदेश, पोचपावती जारी केल्याच्या तारखेपासून कामकाजाच्या 3 दिवसांच्या आत प्रणालीद्वारे जारी केला जाईल असे प्रस्तावित केले गेले आहे.
|
|
9
|
तात्पुरत्या स्वयंचलित परताव्यानंतर कमी जोखीम असलेल्या परताव्याच्या दाव्यावर कशी कार्यवाही केली जाईल?
|
प्रणालीने कमी जोखीम असलेल्या परताव्याच्या अर्जामध्ये तात्पुरता परतावा मंजूर केल्यानंतर, तो अर्ज छाननीसाठी आणि नमुना GST RFD-06 मध्ये अंतिम परतावा आदेश जारी करण्यासाठी योग्य अधिकाऱ्याकडे जाईल.
|
|
10
|
परताव्याचा अर्ज कमी जोखीम असलेला म्हणून वर्गीकृत केला गेला नाही, तर काय होईल?
|
परताव्याचा अर्ज कमी जोखीम असलेला म्हणून वर्गीकृत केला गेला नाही, तर पोचपावती दिल्यानंतर योग्य अधिकाऱ्याकडून त्याची छाननी केली जाईल. ही छाननी तात्पुरता परतावा मंजूर करण्यासाठी (शून्य दर पुरवठा आणि व्यस्त शुल्क रचनेमुळे येणाऱ्या परताव्याच्या दाव्यांच्या बाबतीत) आणि त्यानंतर अंतिम परताव्यावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने केली जाईल.
|
|
11
|
कर अधिकाऱ्याने पोचपावती किंवा त्रुटी टिपण जारी करण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा काय आहे?
|
रोख खातेवहीतील अतिरिक्त शिल्लक रकमेव्यतिरिक्त इतर परताव्याच्या श्रेणींमध्ये, योग्य अधिकाऱ्याने आता परताव्याचा अर्ज दाखल केल्यापासून 10 दिवसांच्या आत नमुना GST RFD-02 अंतर्गत पोचपावती किंवा नमुना GST RFD-03 अंतर्गत त्रुटी टिपण जारी करणे आवश्यक आहे. या कालावधीत पोचपावती किंवा त्रुटी टिपण जारी न केल्यास, प्रणालीद्वारे अर्जाची पोचपावती दिल्याचे मानले जाईल.
|
|
12
|
या कालावधीत पोचपावती किंवा त्रुटी टिपण जारी न केल्यास काय होईल?
|
परताव्याचा अर्ज दाखल केल्यापासून 10 दिवसांच्या आत पोचपावती किंवा त्रुटी टिपण जारी न केल्यास, अर्जाची पोचपावती दिल्याचे मानले जाईल. म्हणजेच, सदर कालावधी संपल्यावर, सामायिक संकेतस्थळाच्या माध्यमातून नमुना GST RFD-02 मधील पोचपावती उपलब्ध करून दिली जाईल.
|
|
13
|
पोचपावती दिल्याचे मानलेल्या परताव्याच्या अर्जावर प्रणालीद्वारे स्वयंचलित पद्धतीने कार्यवाही केली जाईल का?
|
नाही. पोचपावती दिल्याचे मानले जाणे याचा अर्थ केवळ इतकाच आहे की, कार्यवाहीची कालमर्यादा सुरू करण्याच्या उद्देशाने परताव्याचा अर्ज प्राप्त झाला असून तो पूर्ण आहे असे मानले जाते. परताव्याच्या अर्जावरील पुढील कार्यवाही जोखीम आधारित आराखड्यानुसार आणि लागू तरतुदींनुसार केली जाईल.
|
|
14
|
परताव्याच्या अर्जात त्रुटी आढळल्यास कोणती प्रक्रिया केली जाते?
|
- वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी अंतर्गत परताव्यासाठी केलेल्या अर्जात काही त्रुटी आढळल्यास, संबंधित अधिकारी फॉर्म जीएसटी आरएफडी-3 या नमुन्यात त्रुटीविषयक सूचना पत्र जारी करतात. हे सूचना पत्र जारी झाल्यानंतर, मूळ अर्जावर पुढील प्रक्रिया केली जात नाही. अशा वेळी अर्जदाराला नव्याने अर्ज सादर करावा लागतो.
- परताव्याचा अर्ज दाखल करताना इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर किंवा इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमधून वजा केलेली इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा रोख रक्कम, त्रुटीविषयक सूचना पत्र जारी झाल्यानंतर संबंधित लेजरमध्ये आपोआप पुन्हा जमा केली जाते.
- त्यानंतर, अर्जदाराने सूचना पत्रात नमूद केलेल्या त्रुटींची दुरुस्ती करून, त्याच कालावधीसाठी फॉर्म जीएसटी आरएफडी-1 या नमुन्यात परताव्यासाठीचा नवीन अर्ज पुन्हा ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.
|
|
15
|
पोचपावती जारी झाल्यानंतर त्रुटीविषयक सूचना पत्र जारी करता येते का?
|
परताव्याच्या अर्जाची पोचपावती एकदा जारी झाल्यानंतर, त्या अर्जासंदर्भात कोणत्याही कारणास्तव त्रुटीविषयक सूचना पत्र नंतर जारी करता येत नाही.
|
|
16
|
कायदेशीररीत्या निर्धारित केलेल्या कालमर्यादेत परतावा मंजूर न झाल्यास काय होते?
|
परतावा मंजूर करण्यासाठी कायद्याने निर्धारित केलेल्या कालमर्यादेत परतावा मंजूर न झाल्यास, अर्जदाराला विलंबित परताव्याच्या रकमेवर व्याज मिळण्याचा हक्क प्राप्त होतो. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम, 2017 च्या कलम 56 मधील तरतुदींनुसार, 60 दिवसांनंतर झालेल्या विलंबाच्या कालावधीसाठी हे व्याज देय असते.
|
|
17
|
दुसऱ्या टप्प्यात, उलट शुल्क रचनेअंतर्गत केलेल्या परताव्याच्या दाव्यांना परतावा कसा मंजूर केला जाईल?
|
दुसऱ्या टप्प्यात, परताव्याच्या अर्जामध्ये सादर केलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर, प्रणालीद्वारे परताव्याच्या अर्जाची पोचपावती आपोआप जारी केली जाईल. जोखीम मूल्यांकनाच्या आधारे, दावा केलेल्या परताव्याच्या रकमेपैकी 90 टक्के रक्कम प्रणालीद्वारे तात्पुरता परतावा म्हणून आपोआप मंजूर केली जाईल. या रकमेच्या प्रदानासाठीचा आदेश फॉर्म जीएसटी आरएफडी-05 या नमुन्यात जारी केला जाईल. त्यानंतर, अंतिम परतावा मंजुरीचा आदेश जारी करण्यासाठी कर अधिकाऱ्याकडून परताव्याच्या अर्जावर प्रक्रिया केली जाईल.
|
|
18
|
इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमधील अतिरिक्त शिल्लक रकमेचा परतावा आता कशा प्रकारे दिला जाईल?
|
इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमधील अतिरिक्त शिल्लक रकमेचा परतावा आता सामायिक पोर्टलद्वारे पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने दिला जाईल.
|
|
19
|
इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमधील अतिरिक्त शिल्लक रकमेचा परतावा देताना कर अधिकाऱ्याची काही भूमिका असेल का?
|
नाही. अशा प्रकारचा परतावा देण्यासाठी कर अधिकाऱ्याच्या कोणत्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नसून, ही प्रक्रिया त्यांच्याशिवाय पूर्ण केली जाईल.
|
|
20
|
जीएसटी विवरणपत्र अद्याप दाखल केलेले नसल्यास, परताव्यासाठी अर्ज करता येईल का?
|
परताव्यासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी, परताव्याचा अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी दाखल करणे आवश्यक असलेली सर्व जीएसटी विवरणपत्रे संबंधित नोंदणीकृत व्यक्तीने प्रत्यक्षात दाखल केली आहेत, याची खात्री करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर 3 एप्रिल 2026 रोजी परताव्यासाठी अर्ज दाखल करायचा असेल, तर फेब्रुवारी 2026 महिन्याचे जीएसटी विवरणपत्र दाखल केलेले असणे आवश्यक आहे.
|
|
21
|
संबंधित कार्यक्षेत्रातील कर अधिकाऱ्याकडे कागदपत्रे प्रत्यक्ष जमा करण्याची आवश्यकता आहे का?
|
नाही. परताव्याची प्रक्रिया सध्या पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असल्यामुळे, स्वतंत्रपणे कोणतीही कागदपत्रे प्रत्यक्ष जमा करण्याची आवश्यकता नाही. परताव्यासाठी अर्ज दाखल करताना सर्व विवरणपत्रे, घोषणापत्रे, हमीपत्रे आणि आवश्यक पूरक कागदपत्रे सामायिक पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. या सुधारणेनंतरही ही कागदपत्रे संबंधित कार्यक्षेत्रातील कर अधिकाऱ्याकडे प्रत्यक्ष जमा करण्याची आवश्यकता नाही.
|
|
22
|
नवीन अर्जामुळे करदात्यावरील अनुपालनाचा भार वाढेल का?
|
नाही. परताव्यासाठीच्या अद्ययावत अर्जामुळे करदात्यावरील अनुपालनाचा भार वाढणार नाही. यापूर्वी स्कॅन केलेल्या स्वरूपात अपलोड करावी लागणारी माहिती आता अर्जामध्येच नोंदवली जाईल. त्यामुळे प्रणालीच्या माध्यमातून माहितीची जुळवणी करणे शक्य होईल. यामुळे परताव्याची प्रक्रिया अधिक अंदाजयोग्य, सुरळीत आणि पारदर्शक होईल. परिणामी, करदात्यांना याचा लाभ मिळेल.
|
|
23
|
परताव्यासाठी अर्ज दाखल करताना करचलने सादर करणे आवश्यक आहे का?
|
नाही. दिनांक 18 नोव्हेंबर 2019 रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रक क्रमांक 125/44/2019-GST च्या परिच्छेद 36 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, परताव्याचा दावा करताना मूळ किंवा दुय्यम करचलने अर्जासोबत सादर करण्याची आवश्यकता नाही.
|
|
24
|
माझ्या शिपिंग बिलाची आणि निर्यातीतून मिळालेल्या रकमेच्या तपशिलांची पडताळणी आपोआप केली जाईल का?
|
होय. दुसऱ्या टप्प्यात, शून्य दराच्या पुरवठ्याच्या संदर्भातील परताव्यासाठी, प्रणालीचे विविध यंत्रणांशी एकत्रीकरण केले जाईल. शिपिंग बिल आणि निर्यात बिलासंबंधीच्या तपशिलांसाठी आयसीईजीएटीई प्रणालीशी, सेवांच्या निर्यातीपोटी मिळालेल्या रकमेच्या प्राप्तीची पडताळणी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ईडीपीएमएस प्रणालीशी, तसेच विशेष आर्थिक क्षेत्रातील म्हणजेच एसईझेडमधील घटकांना किंवा विकासकांना केलेल्या पुरवठ्याच्या तपशिलांसाठी एसईझेड ऑनलाइन प्रणालीशी एकत्रीकरण केले जाईल. यामुळे या तपशिलांची पडताळणी प्रत्यक्ष कागदपत्रांची हाताने तपासणी करण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येईल.
|
|
25
|
माझा अर्ज प्रणालीच्या पडताळणीत यशस्वी ठरला नाही, तर काय होईल?
|
अर्जाच्या पडताळणीदरम्यान आढळलेल्या विशिष्ट त्रुटींबाबत तुम्हाला कळवण्यात येईल, जेणेकरून तुम्ही त्या त्रुटींची दुरुस्ती करून नव्याने अर्ज दाखल करू शकाल. दुरुस्ती केल्यानंतरही अर्जाची पडताळणी यशस्वी झाली नाही, तर छाननी आणि पुढील कार्यवाहीसाठी तुमचा अर्ज संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल. त्यामुळे तुमच्या परताव्याच्या दाव्यावरील प्रक्रिया पुढे सुरू राहील.
|
|
26
|
प्रणालीद्वारे माझ्या अर्जावर सुरळीतपणे प्रक्रिया होण्यासाठी मी काय करू शकतो?
|
परताव्याच्या अर्जावर प्रणालीद्वारे सुरळीतपणे प्रक्रिया होण्यासाठी, अर्जदाराने पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात.
- अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरली आहे आणि कारकुनी स्वरूपाच्या कोणत्याही चुका झालेल्या नाहीत, याची खात्री करावी.
- परताव्याच्या अर्जामध्ये भरलेली माहिती, अर्जदाराने दाखल केलेल्या विवरणपत्रांमध्ये किंवा शिपिंग बिलासारख्या इतर कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या माहितीशी जुळणारी असावी.
- विविध कागदपत्रांमधील आणि अनुपालनाशी संबंधित नोंदींमधील माहितीमध्ये योग्य ताळमेळ राखल्यास, प्रणालीद्वारे होणारी पडताळणी अयशस्वी होण्याच्या शक्यता टाळता येतात.
- अर्ज दाखल करताना चुका होऊ नयेत, यासाठी सादर करण्यापूर्वी परताव्याचा अर्ज काळजीपूर्वक तपासून घ्यावा.
- परताव्याची रक्कम मोजताना अपात्र इनपुट टॅक्स क्रेडिट अर्थात आयटीसीचा विचार केला जात नाही, याची अर्जदाराने खात्री करावी. उदाहरणार्थ, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम, 2017 च्या कलम 17(5) अंतर्गत प्रतिबंधित असलेले इनपुट टॅक्स क्रेडिट परताव्याच्या गणनेत समाविष्ट करू नये.
- केंद्रीय वस्तू आणि सेवा कर नियम, 2017 मधील नियम 42 किंवा नियम 43 नुसार आवश्यक असलेले इनपुट टॅक्स क्रेडिटचे प्रत्यावर्तन, संबंधित नियमांमध्ये निर्धारित केल्याप्रमाणे केले आहे, याची अर्जदाराने खात्री करावी.
|
|
27
|
कलम 54(11) अंतर्गत माझा परतावा रोखून ठेवण्यात आला असेल आणि नंतर मला तो मिळण्याचा हक्क प्राप्त झाला, तर मला व्याज मिळेल का? या व्याजाची गणना कोणत्या तारखेपासून आणि कोणत्या तारखेपर्यंत केली जाईल?
|
होय. कलम 54(11) अंतर्गत परतावा रोखून ठेवण्यात आला असेल आणि अपील किंवा अन्य कार्यवाहीच्या परिणामी अर्जदाराला नंतर तो परतावा मिळण्याचा हक्क प्राप्त झाला, तर 6 टक्के दराने व्याज देय असेल. हे व्याज परतावा रोखून ठेवण्यात आल्याच्या तारखेपासून प्रत्यक्ष परताव्याची रक्कम अदा केली जाईपर्यंतच्या कालावधीसाठी मोजले जाईल.
|
|
28
|
परताव्याची रक्कम ठरावीक किमान मर्यादेपेक्षा कमी असल्यास परतावा दिला जात नाही का?
|
होय. परताव्याची रक्कम 1 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास परतावा दिला जात नाही. ही किमान मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. 1 हजार रुपयांची ही मर्यादा प्रत्येक करप्रकारासाठी स्वतंत्रपणे लागू न करता, सर्व करप्रकारांतील देय परताव्याच्या एकत्रित रकमेवर लागू केली जाईल. मात्र, कर भरून भारताबाहेर निर्यात केलेल्या वस्तूंच्या संदर्भातील परताव्यासाठी 1 हजार रुपयांची ही किमान मर्यादा लागू होणार नाही.
|
|
29
|
मी वस्तूंची निर्यात करणारा निर्यातदार असून, अशा शून्य दराच्या पुरवठ्यापोटी जमा झालेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटच्या परताव्याचा दावा करत आहे. अशा परिस्थितीत, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर नियमांतील नियम 89(4)(सी) अंतर्गत वस्तूंच्या शून्य दराच्या पुरवठ्याची उलाढाल मोजण्यासाठी, माझ्यासारख्याच परिस्थितीत असलेल्या पुरवठादाराने देशांतर्गत केलेल्या समान वस्तूंच्या पुरवठ्याचे मूल्य देणे मला आवश्यक आहे का?
|
करदात्यांना येणाऱ्या अडचणी आणि समान परिस्थितीत असलेल्या पुरवठादाराने देशांतर्गत विकलेल्या समान वस्तूंचे मूल्य सादर करण्याबाबत त्यांच्या रास्त चिंता लक्षात घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे, परताव्याची रक्कम ठरवताना, देशांतर्गत पुरवठा केलेल्या समान वस्तूंच्या मूल्याच्या दीड पट मूल्य ग्राह्य धरण्याची अट काढून टाकण्यात येत आहे. यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर नियम, 2017 मधील नियम 89(4)(सी) मध्ये सुधारणा करण्यात येत आहे.
|