Economy

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) नोंदणी अर्जासंदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Posted On: 09 OCT 2026 4:57PM

 

क्रं.

प्रश्न

उत्तर

1.

जीएसटी नोंदणीसाठी अर्ज कसा सादर करता येतो?

जीएसटी नोंदणीसाठी अर्ज जीएसटीच्या अधिकृत पोर्टलवरून "www.gst.gov.in" (https://www.gst.gov.in/) ऑनलाइन सादर करता येतो.

 त्यासाठी Services → Registration → New Registration या पर्यायांची निवड करावी.

2.

जीएसटी नोंदणी अर्ज भरण्याची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया कुठे उपलब्ध आहे?

• जीएसटी नोंदणी अर्ज भरण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणारी माहितीपुस्तिका किंवा प्रशिक्षणपर मार्गदर्शिका जीएसटी पोर्टलवर उपलब्ध आहे.

त्यासाठी "www.gst.gov.in" (https://www.gst.gov.in/) या संकेतस्थळावरील Help and Taxpayer Facilities → GST Knowledge Portal → Register with GST या पर्यायांची निवड करावी.

 

• पोर्टलवरील अर्जामध्ये अर्जदारांना आवश्यक माहिती अचूकपणे भरण्यात मदत करण्यासाठी संबंधित पर्यायांबाबत माहिती देणाऱ्या सूचना (टूल टिप्स) आणि तत्काळ मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध आहे.

 

• याशिवाय, सुधारित जीएसटी नोंदणी अर्ज नमुना REG-01 मध्ये माहिती भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना आणि ड्रॉप-डाऊन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे विहित कागदपत्रे सादर करताना अर्जदारांना योग्य मार्गदर्शन मिळेल.

 

3.

जीएसटी नोंदणी अर्जातील विविध रकान्यांमध्ये आवश्यक असलेली माहिती/कागदपत्रांबाबत काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत का?

• जीएसटी नोंदणी अर्जाच्या विविध रकान्यांमध्ये भरायची माहिती आणि सादर करायची कागदपत्रे याबाबत स्पष्ट आणि एकसमान मार्गदर्शन करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आले आहेत. यामध्ये व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचे मुख्य ठिकाण इत्यादी बाबींचा समावेश आहे. नोंदणी अर्जांवर एकसमान आणि जलद प्रक्रिया करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमधील कर अधिकाऱ्यांनाही या सूचनांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

 

• याव्यतिरिक्त, जीएसटी नोंदणी अर्ज आणि त्याच्या प्रक्रियेसंबंधित विविध मुद्द्यांवर एक सविस्तर स्पष्टीकरण देणारे वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात येतील.

 

• या परिपत्रकानुसार नोंदणी अर्जात आवश्यकते बदल केले जातील. करदात्यांना अर्ज धणे अधिक सुलभ व्हावे यासाठी आधीच भरलेली माहिती आपोआप उपलब्ध होणारे रकाने (ऑटो-पॉप्युलेटेड फील्ड्स), ड्रॉप-डाउन मेन्यू आणि सादर करावयाच्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या पॉप-अप्सद्वारे वापरकर्ता प्रणाली अधिक सोपी केली जाईल.

 

4.

जीएसटी नोंदणी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची आणि माहितीची तपासणी सूची (चेकलिस्ट) आहे का?

होय. नोंदणी अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती आणि कागदपत्रे यांचा तपशील एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केला जाईल, जेणेकरून अर्जदार अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे तयार ठेवू शकतील.

5.

मुख्य व्यवसाय स्थळाचा (PPoB)) पुरावा म्हणून कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

विविध परिस्थितींमध्ये पीपीओबी (PPoB) आणि एपीओबी (APoB) चा पुरावा म्हणून आवश्यक असलेल्या कागदपत्रांची एकत्रित यादी प्रदान केली जाईल. विविध परिस्थितींमध्ये व्यवसायाच्या मुख्य ठिकाणाचा (पीपीओबी)आणि अतिरिक्त व्यवसायाच्या ठिकाणाचा (एपीओबी) पुरावा म्हणून आवश्यक असलेल्या कागदपत्रांची एकत्रित यादी परिपत्रकाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार फॉर्म जीएसटी रेग-01 (FORM GST REG-01) मध्ये योग्य तो बदल केला जाईल. त्यानुसार, जेव्हा अर्जदार जीएसटी पोर्टलवर जागेचा प्रकार निवडतो, तेव्हा पोर्टल केवळ त्या विशिष्ट प्रकारच्या जागेसाठी संबंधित कागदपत्रे दर्शवेल. उदाहरणार्थ, मालकीची किंवा भाड्याची जागा यासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. जीएसटी नोंदणी अर्जाच्या संदर्भात याव्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची किंवा अधिकाऱ्याद्वारे मागण्याची आवश्यकता नाही. हे एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले जाईल.

 

***

अंबादास यादव/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com

(Explainer ID: 160409) आगंतुक पटल : 21
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English