Economy

मालवस्तूंशी निगडीत मुद्द्यांवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Posted On: 09 OCT 2026 4:53PM

मालवस्तूंशी निगडीत मुद्द्यांवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न

(अस्वीकृती- सदर उत्तरे ही केवळ शैक्षणिक आणि मार्गदर्शन हेतूने दिली आहेत आणि त्याला कोणतीही कायदेशीर वैधता नाही. संपूर्ण तपशीलासाठी, कृपया याविषयी जारी करण्यात आलेल्या अधिसूचना, परिपत्रके इत्यादींचा संदर्भ घ्यावा.)

1

समुद्र शैवाल अर्कावर आधारित जैव-उत्तेजकांचे वर्गीकरण कसे केले जाते?

 

उत्तर

57व्या जीएसटी परिषदेने स्पष्ट केले आहे की, खते (अजैविक, सेंद्रीय किंवा मिश्र) (नियंत्रण) आदेश 1985 मधील अनुसूची VI अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या समुद्र शैवाल अर्कावर आधारित जैव उत्तेजकांचे वर्गीकरण, हेडिंग 3101 अंतर्गत खते म्हणून केले जाईल. (संदर्भः अधिसूचना क्रमांक9/2025- केंद्रिय कर (दर) दिनांक 17.09.2025 च्या अनसूची I मधील अ.क्र. 237) तसेच, जीएसटी परिषदेने यापूर्वीच्या प्रकरणांचे जैसे थे तत्वावर अनुशासित करण्याची शिफारसही केली आहे.

2.

समु्द्री शैवाल अर्कावर आधारित सर्व उत्पादनांचे वर्गीकरण अधिसूचना क्रमांक 9/2025- केंद्रिय कर (दर) दिनांक 17.09.2025 च्या अनसूची I मधील अ.क्र. 237 अंतर्गत केले जाऊ शकते का?

उत्तर

नाही. समुद्री शैवाल अर्कावरआधारित सर्व उत्पादनांचे अधिसूचना क्रमांक 9/2025- केंद्रिय कर (दर) दिनांक 17.09.2025 च्या अनसूची I मधील अ.क्र. 237 अंतर्गत वर्गीकरण केले जाऊ शकत नाही. खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत नोंदणीकृत असलेली समुद्र शैवाल अर्कावर आधारित जैव-उत्तेजके या नोंदीखाली वर्गीकृत केली जाऊ शकते.

3

वनस्पती वृद्धी नियंत्रकांचा अंतर्भाव असलेली समुद्र शैवाल अर्कावर आधारित उत्पादने, अधिसूचना क्रमांक  9/2025-केंद्रीय कर (दर), दिनांक 17.09.2025मधील अनुसूची I अ. क्र. 237अंतर्गत वर्गीकृत केली जाणार का?

उत्तर

वनस्पती वृद्धी नियंत्रकांचा अंतर्भाव असलेली समुद्र शैवाल अर्कावर आधारित उत्पादने  ही खते (अजैविक, सेंद्रिय किंवा मिश्र) (नियंत्रण) आदेश 1985 अंतर्गत जैव उत्तेजकर म्हणून पात्र ठरणार नाहीत आणि त्यामुळे  अधिसूचना क्रमांक  9/2025-केंद्रीय कर (दर), दिनांक 17.09.2025मधील अनुसूची I अ. क्र. 237अंतर्गत त्यांचे वर्गीकरण केले जाऊ शकणार नाही.

4

जीएसटी दर अधिसूचनांमध्ये खेळण्यांशी संबंधित नोंदींबाबत जीएसटी परिषदेने काय शिफारसी केल्या आहेत?

उत्तर

जीएसटी दर अधिसूचनेतील (अधिसूचना क्र.  09/2025-केंद्रीय कर (दर) दिनांक17.09.2025 मधील अनुसूची I मधील अ. क्र. 497 आणि अनुसूची II मधील अ. क्र 616) खेळण्यांशी संबंधित नोंदींमध्ये सीमाशुल्क दर कायदाच्या प्रकरण शीर्षक अंतर्गत, 9503 नमूद केलेल्या खेळण्यांच्या इतर सर्व प्रकारांचा समावेश होतो, उदा. बाहुल्या, कोडी आणि इतर खेळणी आणि अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, तीनचाकी सायकल, पेडल कार्स आणि स्कूटर्स यापुरत्या त्या मर्यादित नाहीत.

5

सेकंड हँड कार विक्रेत्यांकडून, व्यावसायिक स्वरूपात वापरत असणाऱ्या दुरूस्ती व देखभाल सेवा, सुटे भाग इत्यादींवर इन्कम टॅक्स क्रेडिट घेत असतील तर त्यांना जीएसटी मार्जिन योजने(खरेदी आणि विक्री किंमतीच्या फरकावर लागू होणारा जीएसटी ) अंतर्गत, सवलतीच्या दराने लागू होणाऱ्या जीएसटीच्या लाभापासून वंचित ठेवले जाते का?

उत्तर

नाही. जीएसटी मार्जिन योजनेअंतर्गत, जीएसटीच्या सवलत दराचा लाभ अधिसूचना क्रमांक 8/2018-केंद्रीय कर (दर), अधिसूचना क्र. 9/2018-एकात्मिक कर (दर) आणि अधिसूचना क्र. 1/2018-भरपाई उपकर (दर), अन्वये, व्यवसाय पूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्चा माल वस्तू आणि सेवा यांच्यावर आयटीसी आकारत असला तरीही घेता येतो. मात्र, सेकंड हँड वाहनांचा विक्रेता, जीएसटी मार्जीन योजनेअंतर्गत जीएसटी सवलत दर मिळवू इच्छित असेल तर त्याला त्या वाहन खरेदीवर भरलेल्या कराचा आयटीसी घेता येणार नाही.

6

सब्लिमेशन पेपरचे वर्गीकरण कसे केले आहे?

उत्तर

सब्लिमेशन पेपरच्या अचून वर्गीकरणाविषयी या क्षेत्रात वाद होते.  म्हणजे, सब्लिमेशन पेपर उपशीर्षक 481022 अंतर्गत वर्गीकृत होते की शीर्षक 4809 अंतर्गत. जीएसटी परिषदेने त्यांच्या 57 व्या बैठकीत स्पष्ट केले आहे की, सब्लिमेशन पेपरचे वर्गीकरण  शीर्षक 4809 (दिनांक 17.09.2025 रोजीच्या अधिसूचना क्रमांक. 9/2025-CTR अनुसूची II मधील अ. क्र. 176) अंतर्गत केली जाऊ शकते. त्यापुढे, जीएसटी परिषदेने, मागील कालावधीतील वाद मिटवण्यासाठी जैसे थे तत्वावर अनुशासित करण्याची शिफारसही केली आहे.

7

रिट्रिडिंग (पुनर्वापरासाठी निर्मित)ट्रॅक्टर टायर्सवर जीएसटीची आकारणी कशी केली जाते?

 

 

पुनर्निमित ट्रॅक्टर टायसर्सवरील जीएसटी दर हा नवीन ट्रॅक्टर टायर्सवर लागू असलेल्या जीएसटी दराशी जूळवून त्यांच्या आकारणीतील विसंगती दूर करण्याची शिफारस परिषदेने केली आहे.

8

57व्या जीएसटी परिषदेने प्लास्टिक कचरा आणि टाकाऊ वस्तू, भंगा आणि टाकाऊ टायर, इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कचरा आणि भंगार आणि वापरलेले खाद्यतेल यांच्यासंदर्भात कोणत्या शिफारसी केल्या आहेत?

 

 

57 व्या जीएसटी परिषदेने एका नोंदणीकृत व्यक्तीद्वारे दुसऱ्या नोंदणीकृत व्यक्तिला प्लास्टिक कचरा आणि भंगार, टाकाऊ टायर आणि भंगार, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कचरा आणि भंग आणि वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाच्या पुरवठ्यावर 2% दराने कर उत्पन्नाच्या स्रोतामधून कर कपात (टीडीएस) लागू करण्याची शिफारस केली आहे. परिषदेने अनोंदणीकृत व्यक्तीकडून नोंदणीकृत व्यक्तीला अशा टाकाऊ वस्तू आणि भंगार यांचा पुरवठा केला जात असल्यास रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (आरसीएम) लागू कऱण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी, पुरवठादाराकडून कर मर्यादा ओलांडली गेल्यास त्याला नोंदणी करणे आवश्यक आहे आणि आरसीएम अंतर्गत करपात्र प्राप्तकर्त्याने पुरवठादाराची कर मर्यादा ओलांडली गेल्यास कर भरणा करणे आवश्यक आहे.

9

प्लास्टिक कचरा आणि भंगार, टाकाऊ टायर आणि भंगार, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कचरा आणि भंगार आणि वापरलेले खाद्यतेल यांसंबंधीही शिफारस कोणत्या विद्यमान व्यवस्थेवर आधारित कऱण्यात आली आहे?

 

 

ही व्यवस्था 54व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीतील शिफारसींच्या आधारे सादर करण्यात आलेल्या, धातूच्या भंगारासाठी अस्तित्वात असलेल्या टीडीएस आणि आरसीएम आराखड्यावर आधारित आहे. या आराखड्याअंतर्गत, सीजीएसटी कायदा 2017च्या कलम 51 अन्वये नोंदणीकृत व्यक्तीकडून नोंदणीकृत व्यक्तीला केल्या जाणाऱ्या धातूच्या भंगाराच्या पुरवठ्यावर 2%दराने टीडीएस भरावा लागतो आणि अनोंदणीकृत व्यक्तीला होणाऱ्या धातूच्या भंगाराच्या पुरवठ्यावर प्राप्तकर्त्या व्यक्तीला आरसीएमवर आधारित कर भरावा लागतो.

10

प्लास्टिक कचरा आणि भंगार, टाकाऊ टायर आणि भंगार, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कचरा आणि भंगार तसेच वापरलेल्या खाद्यतेल यांच्यावर 2% दराने टीडीएस केव्हा लागू होतो?

 

 

नोंदणीकृत व्यक्ती जेव्हा दुसऱ्या नोंदणीकृत व्यक्तीला वर नमूद केलेला कचरा आणि भंगार पुरवत असेल, तेव्हा 2% दराने टीडीएस लागू होतो. जर खरेदीदाराला पुरवठादाराला दिलेल्या रकमेतून 2% दराने कर वजा करून तो सरकारकडे जमा करणे आवश्यक आहे.

 

 

11

प्लास्टिक कचरा आणि भंगार, टाकाऊ टायर आणि भंगार, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कचरा आणि भंगार तसेच वापरलेले खाद्यतेल यांच्यावर रिवर्स चार्ज व्यवस्था/यंत्रणा केव्हा लागू होते ?

 

 

एखादी अनोंदणीकृत व्यक्ती वर नमूद केलेला कचरा आणि भंगार, नोंदणीकृत व्यक्तीला पुरवठा करते, तेव्हा आरसीएम लागू होते. अशा प्रकरणांमध्ये, प्राप्तकर्त्यावर, म्हणजे नोंदणीकृत खरेदीदारावर,  पुरवठ्यावरील जीएसटी भरण्याची जबाबदारी येते.

 

12

प्लास्टिक कचरा आणि भंगार, भंगार आणि टाकाऊ टायर्स, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कचरा आणि भंगार तसेच वापरलेले खाद्यतेल यांच्या पुरवठ्यासाठी पुरवठादाराला जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे का?

 

 

सीजीएसटी कायदा 2017च्या कलम 22 अंतर्गत, व्यवहाराची विहीत मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा पुरवठादाराला जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक असते. ही मर्यादा ओलांडल्यास, पुरवठादाराने नोंदणी करणे बंधनकारक आहे आणि नोंदणीकृत व्यक्तींना त्यानंतरच्या पुरवठ्यावर तरतुदी लागू होतात.

13

प्लास्टिकचा कचरा आणि भंगार, टाकाऊ टायर आणि भंगार, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कचरा आणि भंगार तसेच वापरलेले खाद्यतेल यांच्या पुरवठादाराचा पुरवठा विहित मर्यादेपेक्षा की असेल आणि तो अनोंदणीकृत असेल, तरीही प्राप्तकर्त्याला आरसीएम अंतर्गत करभरणा करणे आवश्यक असते का?

 

होय. नोंदणीकृत असलेल्या प्राप्तकर्ता व्यक्तीला, अनोंदणीकृत असलेल्या व्यक्तीकडून, त्याचा नोंदणीसाठी विहित मर्यादेपेक्षा कमी पुरवठा असला तरीही, मिळालेल्या पुरवठ्यावर आरसीएम अंतर्गत जीएसटी भरणे आवश्यक आहे.

14

प्लास्टिक कचरा आणि भंगार, टाकाऊ टायर आणि भंगार, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कचरा आणि भंगार तसेच वापरलेले खाद्यतेल यांच्या प्राप्तकर्त्याला (खरेदीदाराला) या व्यवस्थेअंतर्गत कोणती कर्तव्ये बंधनकारक आहेत?

 

नोंदणीकृत प्राप्तकर्त्याला (खरेदीदाराला) खालील गोष्टी करणे आवश्यक आहे:

 

निर्देशित कचरा आणि भंगाराच्या खरेदीवर नोंदणीकृत पुरवठादाराचा 2% दराने टीडीएस वजा करणे आणि फॉर्म जीएसटीआर-7 मध्ये टीडीएस परतावा दाखल करणे;

 

विहित नियमांनुसार पुरवठादाराला टीडीएस प्रमाणपत्र जारी करणे;

 

अनोंदणीकृत पुरवठादारांकडून या वस्तूंच्या खरेदीवर आरसीएम अंतर्गत जीएसटी भरणे आणि त्याची नोंद परताव्यात नोंद करणे.

15

सायलियम सीडस् (इसबगोल) संदर्भात 57 व्या जीएसटी परिषदेने कोणत्या शिफारसी केल्या आहेत?

 

याविषयावरील संदिग्धता दूर करण्यासाठी आणि स्पष्टता आणण्यासाठी 57व्या जीएसटी परिषदेने दिनांक 17.05.2025 च्या अधिसूचना क्रमांक 10/2025 केंद्रीय कर (दर) मध्ये, जीएसटीचा दर शून्य असा निर्देशित केला आहे, जरी ते ताजे, गोठवलेले, थंड केलेले किंवा सुकवलेले असले तरीही सायलियम सीडस् (इसबगोल) साठी स्वतंत्र नोंद करण्याची शिफारस केली आहे.

 

 

(वरील बदल संबंधित अधिसूचना, परिपत्रके इत्यादी जारी करून लागू केले जातील, ते सीबीआयसीच्या अधिकृत संकेतस्थळ (taxinformation.cbic.gov.in) वर अपलोड केले जातील.)

 

***

हर्षल आकुडे/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com

(Explainer ID: 160408) आगंतुक पटल : 18
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Assamese , Kannada