Rural Prosperity
लोकओएस (LokOS): ग्रामीण उपजीविकेचा डिजिटल आधार
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2026 09:16 AM
पारदर्शकता आणि आर्थिक समावेशकतेला मजबूती
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय-एनआरएलएम) अंतर्गत डिजिटल प्रशासनाचे बळकटीकरण
लोकओएस (लोक = लोक, ओएस = ऑपरेटिंग सिस्टम) हे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय-एनआरएलएम) अंतर्गत स्वयं-सहायता गट आणि त्यांच्या महासंघांच्या संपूर्ण डिजिटायझेशनसाठीचे वेब आणि मोबाइल प्लॅटफॉर्म आहे. डीएवाय-एनआरएलएम हा ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी स्वयंरोजगार, कौशल्यपूर्ण रोजगार आणि शाश्वत उपजीविका यांना प्रोत्साहन देणारा महत्वाकांक्षी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम आहे.
लोकओएस हे सदस्य नोंदी, प्रोफाइल, बचत, कर्जपुरवठा, परतफेड, आर्थिक व्यवहार, उपजीविका आणि एकत्रीकरण उपक्रमांचे डिजिटायझेशन करून स्वयं-सहायता गट (एसएचजी) आणि समुदाय-आधारित संस्था (सीबीओ) यांच्या व्यवस्थापनासाठी एक व्यापक डिजिटल उपाय प्रदान करते. हे व्यासपीठ पुढील पद्धतीने प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापन अधिक मजबूत करते:
- डिजिटल नोंदींद्वारे लेखी नोंदी ठेवण्याचे काम कमी करणे,
- स्वयं-सहायता गटांसाठी व्यवहारांचा रिअल-टाइम मागोवा सक्षम करणे,
- पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि परिचालन कार्यक्षमता सुधारणे, आणि
- स्वयं-सहायता गट नेटवर्क अंतर्गत प्रति वर्ष 2 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांची नोंद करणे
लोकओएसमध्ये वेब आणि मोबाईल ॲप्लिकेशन्सचा समावेश असून, ते वेगवेगळे वापरकर्ता गट आणि कार्यक्षमतांना सेवा देण्यासाठी डिझाइन केले आहे. हे वेब ॲप्लिकेशन प्रशासक, ई-बुककीपर आणि व्यवहार मंजूर करणाऱ्यांना स्वयं-सहायता गट (एसएचजी), ग्राम संघटना (व्हीओ), समूहस्तरीय महासंघ (सीएलएफ) आणि त्यांचे सदस्य तयार करायला आणि मंजूर करायला सहाय्य करते.
मोबाईल ॲप्लिकेशनमुळे क्षेत्रीय स्तरावरील समुदाय-आधारित संस्थांच्या (सीबीओ) उपक्रमांची कार्यक्षमतेने नोंदणी आणि व्यवस्थापन करणे शक्य होते.
|
|
शी-लीप्स: ग्रामीण उद्योजकतेसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म
सेल्फ-हेल्प, आंत्रप्रेन्योर-लाईव्हलीहुड्स अँड एंटरप्राइझ ऍप्लिकेशन फॉर प्रॉस्पेरिटी अँड सस्टेनेबिलिटी (SHE-LEAPS- शी-लीप्स) हे नुकतेच 29 जून 2026 रोजी सुरु करण्यात आले, आणि ते लोकओएस (LokOS) प्लॅटफॉर्म अंतर्गत लागू करण्यात आले. हे ग्रामीण भारतातील स्वयं-सहायता गटांशी (एसएचजी) जोडलेल्या महिलांना सक्षम बनवण्यासाठीचे एक डिजिटल व्यासपीठ आहे. ते उद्योग निर्मिती, कामगिरीचा मागोवा आणि व्यवसाय व्यवस्थापनासाठी एक एकीकृत व्यासपीठ प्रदान करते. ते कृषी आणि बिगर-कृषी उद्योगांना आधार देऊन, शाश्वत आणि लवचिक ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करते.
|
लोकओएसची डिजिटल वैशिष्ट्ये
लोकओएस मोबाईल ॲप डिजिटायझेशन सुलभ करून आणि सुधारित डेटा-आधारित निर्णयक्षमता सक्षम करून समुदाय आणि समुदाय-आधारित संस्थांना सक्षम करते. याची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

- संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन: स्वयं-सहायता गट (एसएचजी), ग्राम संघटना (व्हीओ), समूहस्तरीय महासंघ (सीएलएफ) आणि त्यांच्या सदस्यांची नोंदणी आणि व्यवस्थापन करते.
- युनिक डिजिटल आयडी: समुदाय-आधारित संस्था (सीबीओ) आणि सदस्यांसाठी आधार आणि बँक-लिंक्ड डिजिटल ओळख तयार करते.
- डिजिटल आर्थिक नोंदी: बचत, कर्ज, परतफेड आणि इतर आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवते.
- उपजीविका प्रोफाइलिंग: नियोजनाला समर्थन देण्यासाठी आणि शासकीय योजनांशी समन्वय साधण्यासाठी उपजीविकेचा डेटा संकलित करते.
- भूमिकेवर आधारित प्रशासन: गाव पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत वापरकर्ता व्यवस्थापन, मंजुरी, देखरेख आणि अहवाल सादर करण्यासाठी सक्षम करते.
- रिअल-टाइम ॲनालिटिक्स: डेटा-आधारित निर्णय घेण्यासाठी डॅशबोर्ड आणि एका क्लिकवर अहवाल उपलब्ध करते.
लोकओएस: सामुदायिक संस्थांच्या डिजिटल परिवर्तनाला चालना
लोकओएसने संपूर्ण भारतात आपली पोहोच लक्षणीयरीत्या वाढवली असून, त्यामुळे सामुदायिक संस्थांचे मोठ्या प्रमाणावर डिजिटल परिवर्तन शक्य झाले आहे. हा प्लॅटफॉर्म पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यान्वयन कार्यक्षमता सुधारतो, तसेच सर्व स्तरांवर एकात्मिक कार्यक्रम अंमलबजावणी आणि देखरेख सक्षम करतो. सध्या यात 34 राज्ये / केंद्रशासित प्रदेश, 762 जिल्हे, 7,241 तालुके, 2.57 लाख ग्रामपंचायती आणि 5.92 लाख गावांचा समावेश आहे.
सामुदायिक संस्थांचा समावेश
या प्लॅटफॉर्ममुळे देशभरातील सामुदायिक संस्थांचे मोठ्या प्रमाणावर डिजिटल एकीकरण शक्य झाले आहे. याच्याशी जोडलेले समुदाय आणि समुदाय-आधारित संस्था पुढील प्रमाणे आहेत:
- समूहस्तरीय महासंघ (सीएलएफ): 34,314
- ग्राम संघटना (व्हीओ): 5.62 लाख
- बचत गट (एसएचजी): 94.16 लाख
- स्वयं-सहायता गट सदस्य: 10.03 कोटी

आर्थिक मदतीचा मागोवा
लोकओएस (LokOS) मुळे सामुदायिक संस्थांमधील आर्थिक मदतीचा कार्यक्षमतेने मागोवा घेणे शक्य होते, यामध्ये रिव्हॉल्व्हिंग फंड (आरएफ) मधील ₹9,718.41 कोटी, कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड (सीआयएफ) मधील ₹64,607.66 कोटी आणि कम्युनिटी एंटरप्राइज फंड (सीईएफ) मधील ₹38.34 कोटी यांचा समावेश आहे.
लोकओएस चे लखपती दीदी उपक्रमाला समर्थन
लोकओएस मोठ्या प्रमाणावर जनजागृती, लाभार्थींचा मागोवा आणि डिजिटल देखरेखीद्वारे लखपती दीदी उपक्रमाला समर्थन देते. ते 6,611 मास्टर ट्रेनर, 4.09 लाख कम्युनिटी रिसोर्स पर्सन (सीआरपी) आणि 3.87 कोटी संभाव्य लखपती दीदी (पीएलडी) च्या मजबूत नेटवर्कद्वारे अंमलबजावणी सक्षम करते.
या प्लॅटफॉर्मवर 18.50 कोटी डिजिटल आजीविका रजिस्टर (डीएआर) देखील आहेत, ते उपजीविका नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणीसाठी एक मजबूत डिजिटल पाया प्रदान करतात.
डिजिटलदृष्ट्या सक्षम ग्रामीण भारताची उभारणी
लोकओएस हे डीएवाय-एनआरएलएम अंतर्गत एक परिवर्तनकारी डिजिटल प्लॅटफॉर्म असून, ते समुदाय-आधारित संघटनांचे (सीबीओ) संपूर्ण डिजिटायझेशन सक्षम करते. ते रिअल-टाइम देखरेख आणि डिजिटल आर्थिक व्यवस्थापनाद्वारे पारदर्शकता, प्रशासन आणि कार्यान्वयन कार्यक्षमता वाढवत आहे.
देशव्यापी पोहोच असलेले हे व्यासपीठ 'लखपती दीदी' उपक्रमाला पाठिंबा देत आहे, यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन मिळत आहे. अशाप्रकारे, हे व्यासपीठ आत्मनिर्भर ग्रामीण समुदायांच्या निर्मितीमध्ये योगदान देत आहे.
References
Ministry of Rural Development
https://lokos.dord.gov.in/lakhpatiDidiImpact
https://lokos.dord.gov.in/aboutLokos
https://lakhpatididi.gov.in
https://lokos.dord.gov.in/communityFundshttps://dic.gov.in/lokos/
https://x.com/MoRD_GoI/status/2071507758046916762
Click Here To See PDF
***
AshishSangle / RajashreeAgashe / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(तथ्य सामग्री आईडी: 150750)
आगंतुक पटल : 19
Provide suggestions / comments