• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
अर्थ मंत्रालय

तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगामुळे गोवा केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाला करविषयक कामांचे दूरस्थ नियोजन आणि व्यवस्थापन शक्य

Posted On: 09 MAY 2020 5:26PM by PIB Mumbai

मुंबई, 9 मे 2020

कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे सर्व ठिकाणाची व्यावसायिक कामे आणि कार्यालयीन कार्यवाही सध्या दूरस्थ पद्धतीने करावी लागत असून त्याप्रकारची धोरणे आखावी लागत आहे. गोव्याच्या केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने विनाबिलंब तंत्रज्ञानाचा स्वीकार करत दूरस्थ पद्धतीने काम सुरु केले असल्याने कार्यालयीन कामे सुरळीत सुरु असून करदात्यांसाठी ते सोयीचे ठरले आहे.

केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाच्या (CBIC)व्यवस्था संचालनालयाने CBIC-GST साठीचे अर्ज बघण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाईन व्यवस्था करून दिली आहे, ज्यामुळे त्यांचे काम कुठेही अडत नाही. लॉकडाऊनच्या काळात गोवा आयुक्तालयाने 54 GST दाव्यांची प्रक्रिया पूर्ण करुन परतावे दिले. त्याशिवाय, केंद्रीय अबकारी आणि सेवाकराशी संबंधित चार दावेही निकाली काढण्यात आले. केंद्रीय अबकारी आणि सेवाकराशी सबंधित 10,360 परताव्यांचा आढावा घेण्यात आला. करदात्यांनी पाठवलेल्या 255 कॅन्सलेशन अर्जांवर प्रकिया करण्यात आली तसेच, CGST कार्यालयाने स्वतःहून 311 कॅन्सलेशन केले आहेत.

त्याआधी, काही विशिष्ट कायद्यांमध्ये शिथिलता देण्यासाठीचा अध्यादेश, जारी करण्यात आला होता. अपील करण्यासाठी आणि कर विवरणपत्रे भरण्यासाठीची कालमर्यादा, तसेच GST कायद्याअंतर्गत येणाऱ्या इतर कामांच्या पूर्ततेसाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. CBIC ने देखील कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर व्यापारी सुविधा उपाययोजनांविषयी अनेक माहितीपत्रके जारी केली आहेत.

 

U.Ujgare/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1622504) Visitor Counter : 164

Read this release in: English

Link mygov.in