57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘इफ्फी’मध्ये ‘दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी बेरेंजर थुइन यांना ‘द गोल्डन एज’ या चित्रपटासाठी ‘रौप्य मयूर’ अर्थात ‘सिल्व्हर पीकॉक’ पुरस्कार प्रदान


या महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक चित्रपटात संग्रहित साहित्य आणि प्रत्यक्ष चित्रित केलेल्या दृश्यांची कुशलतेने सांगड घातल्याबद्दल परीक्षक मंडळाकडून दिग्दर्शकाचे कौतुक

Posted On: 28 NOV 2026 7:57PMby PIB MumbaiRelease ID: 2343281Views: 16

 

दिग्दर्शक बेरेंजर थुइन यांना 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘इफ्फी’मध्ये ‘द गोल्डन एज’ या चित्रपटासाठी, ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-पदार्पण’ या श्रेणीत ‘रौप्य मयूर’ अर्थात ‘सिल्व्हर पीकॉक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार आणि महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते.

महोत्सवाच्या समारोप समारंभात झालेल्या या पुरस्कार प्रदान सोहळयात,  बेरेंजर थुईन यांचे बंधु आणि या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक सेलेस्टे थुईन यांनी दिग्दर्शक बेरेंजर यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाची महत्वाकांक्षा आणि त्याचे चित्रपट निर्मितीतील कौशल्य आणि जाण यांची परीक्षक मंडळाने दाखल घेतली. अनेक वर्षांचा कालखंड व्यापणाऱ्या या ऐतिहासिक चित्रपटाची यशस्वी निर्मिती केल्याबद्दल त्यांनी दिग्दर्शकांची प्रशंसा केली. विशेषतः संग्रहित साहित्य आणि प्रत्यक्ष चित्रित केलेली दृश्ये यांची अतिशय सुरेख सांगड घालण्याच्या अभिनव प्रयोगाचे परीक्षक मंडळाने कौतुक केले.

“अनेक वर्षांचा कालखंड व्यापणारा ऐतिहासिक चित्रपट साकारताना येणारी सर्व आव्हाने पहिल्याच चित्रपटात यशस्वीपणे पेलणे ही दुर्मीळ गोष्ट आहे. मात्र, संग्रहित सामग्री आणि प्रत्यक्षात चित्रित करण्यात आलेली दृश्ये यांचा सुरेख मेळ साधत आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर त्यांनी यशस्वीपणे मात केली आहे,” असे निरीक्षण परीक्षकांनी नोंदवले.

या पुरस्कारामुळे बेरेन्जर थुईन यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट, कथेच्या कथनशैलीतील महत्वाकांक्षा आणि चित्रपट माध्यमाचा केलेला कल्पक वापर यामुळे विशेष ठरला आहे.

‘सर्वोत्तम चित्रपट दिग्दर्शक पदार्पण’ ही स्पर्धा, जागतिक चित्रपटसृष्टीतील नवोदित दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केली जाते. या वर्षी या श्रेणीत सात चित्रपटांचा विचार करण्यात आला, ज्यांत पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांचा समावेश होता. या श्रेणीतील विजेत्या दिग्दर्शकाला देण्यात येणाऱ्या या पुरस्कारामध्ये ‘सिल्व्हर पीकॉक’ स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 15 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकाचा समावेश आहे.

‘द  गोल्डन एज’ चित्रपटाचा कथासारांश

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, एका खाटकाच्या घरात जन्म झालेल्या जीन लावूर हीचे एक उमराव घराण्यातील स्त्री (काऊंटेस) होण्याचे स्वप्न असते. निडर आणि निर्भय असणाऱ्या ‘सेलेस्ट’ पासून प्रेरणा घेऊन आणि ‘गिलॉम द बाराँत’ याच्यावरील प्रेमापोटी जीन, 1920 च्या दशकातील चैतन्याने  सळसळते पॅरिस आणि दोन महायुद्धामधल्या अस्थिर आणि अशांत कालखंडातून एक प्रवास सुरू करते. खूप मोठ्या बदलांची पार्श्वभूमीवर असलेल्या या शतकात ती स्वतःचे भवितव्य स्वतः घडवण्याचा निर्धार असलेली स्वतंत्र स्त्री म्हणून उदयास येते.

***

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

माधुरी पांगे/सविता म्हसकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2343281
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026