Posted On:
28 NOV 2026 5:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती पंतप्रधानांनी सहवेदना व्यक्त केली असून जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटले आहे ;
उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल ऐकून तीव्र दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी प्रार्थना.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांच मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल : PM@narendramodi”
***
माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com