सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नशा मुक्त युवा,विकसित भारत प्रश्नमंजुषा स्पर्धा 74,636 नागरिकांच्या सहभागासह संपन्न


14.40 कोटी युवक आणि 11.38 कोटी महिलांसह एकूण 35.97 कोटींहून अधिक लोकांपर्यंत नशा मुक्त भारत अभियानाची पोहोच

Posted On: 26 NOV 2026 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे, 'नशा मुक्त भारत अभियाना' अंतर्गत आयोजित, 'नशा मुक्त युवा, विकसित भारत क्विझ (प्रश्नमंजुषा स्पर्धा) 25 नोव्हेंबर 2026 रोजी संपन्न झाली. या उपक्रमात देशभरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या प्रश्नमंजुषेत एकूण 74,636 नागरिकांनी सहभाग नोंदवला. सहभागींनी 20 प्रश्नांमध्ये सरासरी 13.82 गुण मिळवले, तर सर्वोच्च गुण 20  इतके होते. सहभागींनी सर्व प्रश्न सोडवायला सरासरी 4 मिनिटे इतका वेळ घेतला, यामधून अमली पदार्थांच्या सेवनापासून प्रतिबंध करण्याबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो.

मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 26 ऑक्टोबर 2026 रोजी 'माय भारत' (MY Bharat) पोर्टलद्वारे ही प्रश्नमंजुषा सुरू करण्यात आली. यामध्ये 20 बहुपर्यायी प्रश्न होते. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांबाबत जागरूकता वाढवणे आणि विशेषतः तरुणांमध्ये सुजाण निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते. प्रश्नमंजुषा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर सहभागींना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली आणि अमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंध करण्याबाबत त्यांची समज अधिक दृढ व्हावी, यासाठी त्यांना योग्य उत्तरेही उपलब्ध करून देण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक शिक्षण, जनजागृती, उपचार, पुनर्वसन आणि सामुदायिक सहभागाद्वारे, अमली पदार्थांची मागणी कमी करण्याच्या प्रयत्नांना बळकट करणे, हे 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू करण्यात आलेल्या 'नशा मुक्त भारत अभियाना'चे उद्दिष्ट आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सुरुवातीला 272 संवेदनशील जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेने देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपली व्याप्ती वाढवली असून, ती अमली पदार्थांच्या सेवनाविरूद्धची देशव्यापी लोकचळवळ बनली आहे, असे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे अभियान 35.97 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचले असून, यात 14.40 कोटी युवक आणि 11.38 कोटी महिलांचा समावेश आहे. हे या मोहिमेची व्यापक पोहोच आणि त्यामध्ये लोकांचा वाढता सहभाग दर्शवते.

एनएमबीए (NMBA) ई-प्रतिज्ञा QR कोड

या अभियानांतर्गत, शैक्षणिक संस्थांमध्ये 34.40 लाखांहून अधिक उपक्रम राबवण्यात आले, विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच त्यांना सुजाण निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

याव्यतिरिक्त, देशभरात कार्यरत असलेल्या 'सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे   पाठबळ असलेल्या 755 हून अधिक व्यसनमुक्ती केंद्रांच्या जाळ्याद्वारे 39.91 लाख व्यक्तींवर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

या अभियानात लोकसहभाग हा आजही एक महत्त्वाचा आधार असल्याचे अधोरेखित करत, संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, 50.45 लाखांहून अधिक नागरिकांकडून 'नशा मुक्त' प्रतिज्ञा घेतल्या, याव्यतिरिक्त, तळागाळातील स्तरावर जनजागृती, लोकसहभाग आणि प्रतिबंधात्मक उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी 2 लाखांहून अधिक 'नशा मुक्ती मित्रांची’ नोंदणी झाली.

एनएमबीए (NMBA) मोबाइल अॅप

हे नमूद करणे उचित ठरेल की, ‘नशा मुक्त युवा, विकसित भारत क्विझ’चा उद्देश अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांबाबत लोकांची समज अधिक सखोल करणे, त्यांना सुजाण निर्णय घ्यायला प्रवृत्त करणे आणि तरुणांना जनजागृती आणि प्रतिबंधाचे दूत बनण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा होता. हा उपक्रम विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक पाया म्हणून, निरोगी, सक्षम आणि अमली पदार्थमुक्त समाजाच्या दृष्टिकोनाला बळकटी देतो.

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai  

 


(Release ID: 2342287) अभ्यागत कक्ष : 18