Posted On:
26 NOV 2026 4:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांचा एक लेख सामायिक केला. या लेखात ऑलिम्पिकचे स्वप्न संपूर्ण भारतातील महिलांसाठी नव्या संधींची कवाडे कशा प्रकारे खुली करू शकते, यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.
2036 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची भारताची महत्त्वाकांक्षा क्रीडा क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊ शकते, तळागाळातील पायाभूत सुविधा मजबूत करू शकते आणि आर्थिक स्वातंत्र्याचे मार्ग कसे निर्माण करू शकते, या मुद्द्यांवर पी. व्ही. सिंधू यांनी प्रकाश टाकला आहे. त्याचबरोबर 'अस्मिता' सारख्या उपक्रमांवर आणि क्रीडा क्षेत्रातील यश महिला खेळाडूंच्या पुढील पिढीला प्रेरणा देऊ शकते, यावरही त्यांनी भर दिला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे:
“ऑलिंपिकचे स्वप्न संपूर्ण भारतातील महिलांसाठी नवीन संधी निर्माण करू शकते.
प्रसिद्ध बॅडमिंटनपटू @Pvsindhu1 यांनी लिहिलेल्या लेखात, भारताची 2036 ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याची महत्त्वाकांक्षा खेळांमध्ये महिलांचा सहभाग कसा वाढवू शकते, तळागाळातील पायाभूत सुविधा कशा मजबूत करू शकते आणि आर्थिक स्वातंत्र्याचे मार्ग कसे निर्माण करू शकते, याबाबत विचार मांडले आहेत.
त्यांनी अस्मिता (ASMITA) सारख्या उपक्रमांवर आणि क्रीडा क्षेत्रातील यश महिला खेळाडूंच्या पुढील पिढीला प्रेरणा देण्यात अशा प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावू शकते, यावर प्रकाश टाकला आहे.”
https://www.hindustantimes.com/opinion/india-hosting-the-olympics-will-empower-its-women-101795631127186.html
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai