Posted On:
26 NOV 2026 3:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026
गुजरातमधील पाटण येथील अमृतसर-जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरवर (NH-754A) 24 नोव्हेंबर 2026 रोजी भारतीय लष्कराच्या चार विमानांनी यशस्वी लँडिंग केले. योग्य प्रकारे रचना केलेल्या राष्ट्रीय महामार्गांचे पट्टे आपत्कालीन आणि संरक्षण मोहिमांच्या उद्देशांसह विशेष परिचालन गरजा पूर्ण करण्यासाठी संभवतः उपयुक्त ठरू शकतात, हे या प्रात्यक्षिकाने दाखवून दिले.
महू येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (MCTE) च्या आर्मी ॲडव्हेंचर नोडल सेंटर (AANC) द्वारे आयोजित 'विंग्ज ऑफ व्हॅलर अँड युनिटी एक्सपिडिशन 2026' चा भाग म्हणून, भारतीय लष्कराच्या 'टीम माउंटन ईगल्स'च्या या विमानांनी (2 फिक्स्ड-विंग मायक्रोलाईट विमाने + 2 पॉवर्ड हँग ग्लायडर्स) कांडला विमानतळावरून उड्डाण केले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भारतीय लष्कराच्या 'टीम माउंटन ईगल्स', भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
कॉरिडॉरची अभियांत्रिकी क्षमता
या संबंधित भागातील पट्ट्याची 550 मिमी पेव्हमेंट क्रस्ट आणि 500 मिमी सबग्रेडसह 170 दशलक्ष मानक ॲक्सल (MSA) वाहतूक भार सहन करण्याच्या क्षमतेनुसार रचना करण्यात आली आहे. विमानांच्या या यशस्वी लँडिंगमुळे कॉरिडॉरच्या अभियांत्रिकी क्षमतेकडे लक्ष वेधले गेले असून, तांत्रिक मूल्यांकन, परिचालन आवश्यकता आणि आवश्यक सुरक्षा मंजुरीच्या अधीन राहून, विशेष कामांसाठी महामार्गांच्या योग्य भागांचा वापर करण्याच्या उपयुक्ततेला अधोरेखित केले आहे.

नितीन फुल्लुके /शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai