पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी जागतिक सांस्कृतिक चर्चेला आकार देण्यात भारताच्या संस्कृतीविषयक वारशाची वाढती भूमिका अधोरेखित करणारा लेख केला सामायिक

Posted On: 25 NOV 2026 2:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा एक लेख सामायिक केला. यात जागतिक सांस्कृतिक चर्चेला आकार देण्यात भारताच्या संस्कृतीविषयक वारशाची वाढती भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.

शेखावत यांनी पहिल्या एससीओ सांस्कृतिक संवाद मंचावर आणि इंद्रप्रस्थ जाहीरनाम्यावर प्रकाश टाकला असून, यात अधिक मजबूत सांस्कृतिक सहकार्यासाठीची चौकट मांडण्यात आली आहे, तसेच भारत आपल्या वारशाचे जतन, सांस्कृतिक संशोधन, नवोन्मेष आणि सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा जागतिक स्तरावर कसे नेऊ शकतो, याचा शोध घेण्यात आला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर पोस्ट केले आहे:

“जागतिक सांस्कृतिक चर्चेला आकार देण्यात भारताच्या संस्कृतीविषयक वारशाची भूमिका वाढत आहे.

केंद्रीय मंत्री @gssjodhpur यांनी पहिल्या एससीओ सांस्कृतिक संवाद मंचाबद्दल आणि इंद्रप्रस्थ जाहिरनाम्याबद्दल लिहिले असून, यात सांस्कृतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी चौकट  मांडली आहे.

भारत आपल्या वारशाचे जतन, सांस्कृतिक संशोधन, नवोन्मेष आणि सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा जागतिक स्तरावर कसे नेऊ शकतो, याचा त्यांनी शोध घेतला आहे.


https://indianexpress.com/article/opinion/columns/sco-civilisational-dialogue-forum-lets-create-spaces-where-civilisations-engage-with-dignity-10977257/lite/”

 

नितीन फुल्लुके /राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2341223) अभ्यागत कक्ष : 3