57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

57 व्या 'इफ्फी' (IFFI) मध्ये तामिळ चित्रपट ‘कूदू’ (Koodu) द्वारे पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक जबाबदारीचे चित्रण


पृथ्वी ही केवळ मानवाची नसून ती सर्वच सजीवांची आहे, असे प्रतिपादन करत दिग्दर्शक जोयल विजय यांनी केले सहअस्तित्वाचे महत्त्व अधोरेखित

Posted On: 23 NOV 2026 6:42PMby PIB MumbaiRelease ID: 2340588Views: 4

गोवा, 23 नोव्‍हेंबर 2026

 

गोवा येथे 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पार्श्वभूमीवर पत्र सूचना कार्यालयाच्या  वतीने आयोजित पत्रकार परिषदेत कुदू या तामिळ चित्रपटाचे दिग्दर्शक जोयल विजय, निर्माते राजेश मेनन आणि गणेश एम., तसेच अभिनेते व्ही. जयप्रकाश यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संपूर्ण चमूने आपल्या ‘कूदू’ (घरटे) या तामिळ चित्रपटाविषयीचे विचार, त्यामागील प्रेरणा आणि या चित्रपटातून दिला जाणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याबद्दल सविस्तर माहिती दिली.

तामिळनाडूतील वाचाथी गावामध्ये या चित्रपटाचे कथानक घडते. गावातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर एका ट्रान्सफॉर्मरमध्ये अंडी असलेले चिमणीचे घरटे आढळून येते आणि तिथूनच खऱ्या अर्थाने कथेला सुरुवात होते. गावप्रमुख अगथियान यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पदवीधर कथिर् आणि गावकरी त्या पक्ष्यांच्या रक्षणासाठी तब्बल 35 दिवस विजेविना राहण्याचा निर्णय घेतात. मात्र, त्यांच्या या निर्णयाला तीव्र विरोधाला सामोरे जावे लागते. इतकी आव्हाने असूनही, ते घरटे सुरक्षित राहावे यासाठी कथिर् आणि गावकरी मोठा त्याग करतात.

पृथ्वी ही केवळ मानवाची नसून ती असंख्य इतर सजीवांचेही घर आहे, असा संदेश दिग्दर्शक जोयल विजय यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. सहअस्तित्वाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. इतर सर्व जीवांचा आदर करणे, त्यांचे रक्षण करणे आणि त्यांच्याशी सुसंवाद साधून जगणे ही आपलीच जबाबदारी आहे, याची जाणीव मानवाने ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

या चित्रपटाचा भाग बनल्याने आपल्या वैयक्तिक सवयींमध्ये कसा बदल झाला, हे अभिनेते व्ही. जयप्रकाश यांनी यावेळी सांगितले. या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आपण या प्रकल्पासाठी होकार दिला, विशेषतः ही कथा एका सत्य घटनेवर आधारित असल्याने आपण त्याकडे अधिक आकर्षित झालो, असे त्यांनी सांगितले. चित्रपटातील पर्यावरणाच्या संदेशातून मिळालेली प्रेरणा त्यांनी सांगितली. यातून त्यांना मिळालेली सर्वात मोठी वैयक्तिक शिकवण म्हणजे टिश्यू पेपरच्या वापराबाबत अधिक जागरूक होणे तसेच दैनंदिन वापर आणि वृक्षतोड यांच्यातील परस्परसंबंध देखील यामुळे प्रकर्षाने जाणवला, असे जयप्रकाश यांनी सांगितले. 

निर्माते राजेश मेनन यांनी या कथेतील भावनिक ओढ आणि पर्यावरणाचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पटकथेमध्ये स्वीकारलेली रंजक व प्रभावी मांडणी अधोरेखित केली. हा विषय अतिशय गंभीर व जड न करता, अर्थपूर्ण संवाद आणि आपल्यालाही जवळच्या वाटणाऱ्या परिस्थितींच्या माध्यमातून, 35 दिवस विजेविना राहण्याच्या गावकऱ्यांच्या निर्णयातून निर्माण होणाऱ्या व्यावहारिक प्रश्न व आव्हानांना हा चित्रपट कसा सामोरे जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, चित्रपटातील हा संदेश आणि तो प्रेक्षकांशी किती सुसंगत आहे, या जाणिवेमुळेच या चित्रपटाच्या प्रकल्पाला  पाठिंबा देण्याची प्रेरणा मिळाली असल्याचेही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन प्रवीण कुमार एस. यांनी केले.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/वैभवी जोशी/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340588
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026