पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दारिद्र्याविरुद्ध भारताच्या लढ्यामुळे देशभरातील नागरिकांच्या जीवनमानात कसा बदल घडत आहे यावरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 23 NOV 2026 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026

दारिद्र्याविरुद्ध भारताच्या लढ्यामुळे देशभरातील नागरिकांच्या जीवनमानात कसे बदल घडत आहेत, याविषयी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला. दारिद्र्य निर्मूलनासाठी केवळ तात्पुरती मदत देण्याऐवजी, दारिद्र्याला कारणीभूत ठरणारे अडथळे दूर करण्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कसा भर दिला जात आहे, हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखात स्पष्ट केले आहे.

“घरकुल, आरोग्यसेवा, स्वच्छ पाणी, बँकिंग सुविधा आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे कोट्यवधी कुटुंबांच्या जीवनमानात झालेली सुधारणा, तसेच ग्रामीण महिलांचा आर्थिक क्षेत्रातील वाढता सहभाग यांचा आढावा त्यांनी या लेखात घेतला आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

मोदी एक्स (X) समाजमाध्यमावर टिप्पणी करताना म्हणतात;

मूलभूत गरजांपासून ते उपजीविकेच्या नव्या संधींपर्यंत, दारिद्र्याविरुद्धच्या भारताच्या लढ्यामुळे देशभरातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, दारिद्र्य निर्मूलनासाठी केवळ तात्पुरता दिलासा देण्याऐवजी, दारिद्रयाला कारणीभूत ठरणारे अडथळे दूर करण्यावर कसा भर दिला जात आहे, याविषयी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखात लिहिले आहे.

घरकुल, आरोग्यसेवा, स्वच्छ पाणी, बँकिंग सुविधा आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे कोट्यवधी कुटुंबांच्या जीवनात झालेली प्रगती, तसेच ग्रामीण महिलांचा आर्थिक क्षेत्रातील वाढता सहभाग यांचा आढावा त्यांनी या लेखात घेतला आहे.


निलीमा चितळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2340392) अभ्यागत कक्ष : 7