पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बोट्सवानातून आणलेल्या चित्त्याच्या मादीने दिला चार बछड्यांना जन्म, भारतीय चित्त्यांची संख्या पोहोचली 62 वर


'प्रोजेक्ट चित्ता'च्या यशासाठी तज्ज्ञांच्या आणि आघाडीवरील वन कर्मचाऱ्यांची समर्पित वृत्ती, वचनबद्धता आणि कठोर परिश्रमाची भूपेंद्र यादव यांनी केली प्रशंसा

Posted On: 20 NOV 2026 1:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 नोव्‍हेंबर 2026

 

बोट्सवानावरून आणलेल्या KOMG 3 या अडीच वर्षांच्या मादी चित्त्याने, आज जंगलात 4 निरोगी बछड्यांना जन्म दिला आहे; 'प्रोजेक्ट चित्ता' आणि चित्त्यांची शाश्वत लोकसंख्या पुन्हा प्रस्थापित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली. KOMG 3 ही बछड्यांना जन्म देणारी बोत्सवानातून आणलेल्या पहिलीच चित्त्याची मादी आहे, असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक परिस्थितीत बछड्यांना जन्म देण्यापूर्वी तिने जंगलात 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ घालवला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 2022 मध्ये पुनर्वसन कार्यक्रम सुरू झाल्यापासून जंगलात जन्म झाल्याची ही दुसरी नोंद आहे.

या 4 बछड्यांच्या जन्मामुळे भारतातील चित्त्यांची संख्या वाढून 62 झाली आहे, ज्यामध्ये भारतात जन्मलेल्या 43 चित्त्यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. चित्त्यांची संख्या एका विशिष्ट गतीने वाढवून ती संतुलित करण्याच्या भारताच्या प्रवासातील हा एक अभिमानास्पद टप्पा आणि 'प्रोजेक्ट चित्ता'साठी एक ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

वन्यजीव संवर्धनासाठी संयम, चिकाटी आणि सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते, याची पुनरुच्चार करत अशा प्रकारचा जन्म वन्यजीवसंवर्धनाच्या आशा अधिक दृढ करतो आणि संवर्धनाप्रति वचनबद्धता अधिक भक्कम करतो, असे यादव यांनी अधोरेखित केले. 'प्रोजेक्ट चित्ता'च्या यशासाठी अथक परिश्रम करणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापकांचे, पशुवैद्यकांचे, आघाडीवरील वन कर्मचाऱ्यांचे आणि इतर सर्वांचे समर्पण, वचनबद्धता आणि कठोर परिश्रमांच्या महत्त्वाची त्यांनी दखल घेतली.

 

* * *

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे


(Release ID: 2338950) अभ्यागत कक्ष : 8