पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

झारखंडच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या

Posted On: 15 NOV 2026 3:02PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील जनतेला मनापासून शुभेच्छा दिल्या.

झारखंडचे वर्णन करताना पंतप्रधानांनी म्हटले की, हे राज्य आदिवासी अस्मिता, सांस्कृतिक विविधता आणि नैसर्गिक संपत्तीचा एक अनोखा संगम आहे. येथील घनदाट जंगले, नयनरम्य धबधबे आणि ऐतिहासिक स्थळे राज्याला एक वेगळी ओळख देतात. तसेच, येथील परंपरांना भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्याच्या आणि बलिदानाच्या कथांतून सतत प्रेरणा मिळते. खनिजे आणि ऊर्जेपासून ते हस्तकला आणि पर्यटनापर्यंत या राज्यात असलेल्या अफाट क्षमतेचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, येथील कष्टाळू आणि प्रतिभावान नागरिकांच्या दृढनिश्चयामुळे आणि क्षमतेच्या जोरावर झारखंड विकासाची नवी शिखरे गाठेल. त्यांनी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

आपले राज्य हे आदिवासी अभिमान, सांस्कृतिक विविधता आणि नैसर्गिक संपत्ती यांचा एक अनोखा संगम आहे. येथील घनदाट जंगले, नयनरम्य धबधबे आणि ऐतिहासिक स्थळे या राज्याची अद्वितीय ओळख समृद्ध करतात.

भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्य आणि त्यागाच्या कथांनी या राज्याच्या परंपरांना सातत्याने प्रेरणा दिली आहे.

खनिजे आणि ऊर्जा क्षेत्रापासून ते हस्तकला आणि पर्यटन क्षेत्रापर्यंत, या राज्यात प्रचंड क्षमता आहे.

मला खात्री आहे की, माझ्या मेहनती आणि प्रतिभावान कुटुंबीयांच्या दृढनिश्चयाने आणि सामर्थ्याने हे राज्य विकासाची नवी उंची गाठेल.

या विशेष दिनी येथील सर्व लोकांना आनंद, समृद्धी आणि कल्याण लाभो, अशी माझी इच्छा आहे.

***

सुषमा काणे/राजेश शिरभाते/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2336604) अभ्यागत कक्ष : 25