पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कर्करोगाच्या उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि आरोग्यसेवा सर्वांना परवडण्याजोगी व्हावी यासाठी भारताने उचललेल्या पावलांवर केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी लिहिलेला लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 13 NOV 2026 2:41PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.

कर्करोगाच्या औषधांच्या किमती कमी करण्यापासून ते कर्करोग उपचारांच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यापर्यंत, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण पावले उचलत असल्याचे या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील संदेशात म्हटले आहे:

“दर्जेदार आरोग्यसेवा मिळवण्याची संधी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे मर्यादित राहता कामा नये.

कर्करोगावरील औषधांच्या किमती कमी करण्यापासून ते कर्करोग उपचारांच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यापर्यंत, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी या विषयावर मांडलेला दृष्टिकोन आणि पुढील वाटचालीची दिशा जाणून घ्या. "

हा लेख वाचा- https://www.hindustantimes.com/opinion/when-cancer-hits-the-cost-of-treatment-shouldn-t-bite-101794509358328.html

 

***

Radhika Aghor / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335991) अभ्यागत कक्ष : 6