पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान बस्तरमध्ये जवानांबरोबर साजरी करणार दिवाळी

Posted On: 08 NOV 2026 10:22AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, छत्तीसगडमधील बस्तर इथं शूर सुरक्षा कर्मचाऱ्यांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदान, निस्वार्थ सेवा आणि देशाप्रती असलेल्या अढळ निष्ठेला आदरांजली वाहण्यासाठी जात आहेत.

पंतप्रधानांनी नमूद केले की, एक काळ नक्षलवादाने प्रभावित असलेल्या बस्तरमध्ये विकासाची भरभराट होत आहे.

एक्स या समाजमाध्यमांवरील संदेशात मोदी यांनी नमूद केले की,

'आपल्या शूरवीर सुरक्षा दलांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी बस्तरला रवाना होत आहे.'

हा तोच परिसर आहे जिथे एकेकाळी नक्षलवादाचा प्रभाव होता आणि आता विकास फुलतो आहे.

मी आपल्या शूर सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्याग, निस्वार्थ सेवा आणि राष्ट्राप्रती असलेल्या अढळ निष्ठा यांच्यासाठी सलाम करणार आहे. 

***

अंबादास यादव /विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2334098) अभ्यागत कक्ष : 19