संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दल आणि श्रीलंकेच्या तटरक्षक दलादरम्यान पार पडली नववी उच्चस्तरीय बैठक

Posted On: 03 NOV 2026 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2026

 

भारतीय तटरक्षक दल  आणि श्रीलंकेच्या तटरक्षक दलातील 9 वी उच्चस्तरीय बैठक, 03 नोव्हेंबर 2026 रोजी मिरीस्सा येथे आयोजित करण्यात आली होती.

भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी यांनी केले, तर श्रीलंकेच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व श्रीलंका तटरक्षक दलाचे महासंचालक रिअर ॲडमिरल रुवान रुपासेना यांनी केले.

ही बैठक सागरी प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना, सागरी शोध आणि बचाव, आणि सागरी कायदा अंमलबजावणी  यासह परस्पर हिताच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर केंद्रित होती. दोन्ही तटरक्षक दलांमधील कार्यात्मक  सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी क्षमता निर्माण आणि तांत्रिक सहाय्य उपक्रमांना गती देण्याच्या मार्गांवरही चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान, दोन्ही शिष्टमंडळांनी उदयोन्मुख सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सामायिक सागरी क्षेत्रात सुरक्षा, संरक्षण तसेच पर्यावरणाचे रक्षण सुनिश्चित करण्यासाठी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षित आणि स्वच्छ सागरी पर्यावरण निर्माण करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करणे, सागरी आपत्कालीन परिस्थितींना समन्वयाने प्रतिसाद देणे आणि प्रादेशिक सहकार्याला चालना देणे, यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि श्रीलंका तटरक्षक दल कटिबद्ध असल्याचे या बैठकीतून अधोरेखित झाले.

 

* * *

निलिमा चितळे/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332302) अभ्यागत कक्ष : 11