वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीपीआयआयटी द्वारा कार्यालयांमधील प्रलंबितता कमी करणे व स्वच्छतेचे संस्थात्मकीकरण यासाठी विशेष अभियान 6 ची अंमलबजावणी


विशेष अभियान 6 अंतर्गत डीपीआयआयटीचे 99 टक्के नागरी तक्रारींचे निवारण व 83 टक्के अधिकृत इ-फाइल्सचे कामकाज पूर्ण

Posted On: 02 NOV 2026 5:22PM by PIB Mumbai

‍नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2026

उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) आणि त्याच्या अखत्यारितील कार्यालयांमध्ये प्रशासकीय सुधारणा व नागरी तक्रार निवारण विभागाच्या (डीएआरपीजी) मार्गदर्शनाखाली विशेष अभियान 6 राबवले जात आहे. विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे संस्थात्मकीकरण करणे व कार्यालयीन कामकाजातील प्रलंबितता कमी करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

अंमलबजावणीच्या टप्प्यामध्ये डीपीआयआयटीने अनेक मानकांबाबतीत लक्षणीय प्रगती केली आहे. पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), मंत्रीमंडळ, संसद सदस्य, राज्य सरकारे आणि नागरी तक्रार निवारण (पीजी) अपील यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित संदर्भासह सर्व श्रेणींमधील प्रलंबित प्रकरणांची दखल घेण्यात आली असून ती वेळेत व परिणामकारकरित्या निकाली काढण्यासाठी सुनियोजित प्रयत्न केले जात आहेत.

28 ऑक्टोबर 2026 च्या तपशीलानुसार डीपीआयआयटीने पीएमओ कडून प्राप्त  50 टक्क्यांपेक्षा अधिक संदर्भ, मंत्रीमंडळ/आंतरमंत्रालयीन समिती (आयएमसी) व राज्य सरकारांकडून प्राप्त सुमारे 75 टक्के संदर्भ, 99 टक्क्यांपेक्षा जास्त नागरी तक्रारी आणि 80 टक्क्यांपेक्षा जास्त नागरी तक्रार अपीले यशस्वीरित्या निकाली काढली आहेत. विभागाने 83 टक्के अधिकृत इ फाइल्सवरही यशस्वी कार्यवाही केली असून याद्वारे विभागाचे कार्यक्षम नोंदी व्यवस्थापनाचे प्रयत्न दिसून येतात. या उपक्रमांमुळे कामकाजाच्या ठिकाणी अधिक स्वच्छता राखण्यामध्ये मदत झाली आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयातील एकंदर वातावरण सुधारले.

2 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष अभियान 6 ची अंमलबजावणी करण्याआधी 15 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान याची पूर्वतयारी करण्यात आली होती. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व, कार्यक्षम नोंदी व्यवस्थापन व प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढणे याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी या अभियानाची मदत झाली. डीपीआयआयटी आपल्या सर्व संलग्न व उपशाखीय कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे संस्थात्मकीकरण व प्रलंबितता कमी करणे यासाठी वचनबद्ध आहे. यातून अधिक स्वच्छ, कार्यक्षम व प्रतिसादात्मक कार्यालयीन वातावरणाला चालना दिली जात आहे. 

 

नितीन फुल्लुके /सुरेखा जोशी /प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2331692) अभ्यागत कक्ष : 16