पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हरियाणा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 NOV 2026 12:37PM by PIB Mumbai

 

हरियाणा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.  अभिमानास्पद इतिहास, अदम्य साहस आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले हरियाणा राज्य संपूर्ण देशासाठी अभिमानाचा स्रोत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. इथल्या लोकपरंपरा आणि चैतन्यमय ग्रामीण संस्कृतीने भारताच्या सांस्कृतिक वारशाला नेहमीच समृद्ध केले आहे,असंही त्यांनी सांगितलं.

हरियाणातील जनतेने शेती, क्रीडा, संरक्षण सेवा, उद्योग, शिक्षण आणि स्टार्टअप्ससह विविध क्षेत्रांत कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या माध्यमातून आपली प्रतिभा आणि दृढनिश्चय सिद्ध केला आहे. राज्यातील खेळाडू तिरंग्याचा मान उंचावत आहेत, तर इथले शेतकरी देशाची अन्नसुरक्षा अधिक बळकट करत आहेत, असे गोरवोद्गार त्यांनी काढले.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,

हरियाणा दिनानिमित्त राज्यातील माझ्या सर्व कुटुंबीयांना मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

आपले राज्य, गौरवशाली इतिहास, उल्लेखनीय शौर्य आणि समृद्ध संस्कृतीने नटलेले असून, ते राष्ट्राचा अभिमान आहे. येथील लोकपरंपरा आणि चैतन्यमय ग्रामीण संस्कृतीने राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा नेहमीच समृद्ध केला आहे.

आपल्या कठोर परिश्रमातून आणि समर्पणातून, हरियाणाच्या लोकांनी कृषी, क्रीडा, संरक्षण सेवा, उद्योग, शिक्षण आणि स्टार्टअप्स यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये आपली प्रतिभा आणि दृढनिश्चय सिद्ध केला आहे. इथले खेळाडू तिरंग्याचा सन्मान वाढवत असताना, दुसरीकडे शेतकरी राष्ट्राची अन्नसुरक्षा मजबूत करत आहेत.

हा विशेष दिन येथील प्रत्येकाच्या जीवनात आनंद देवो, अशा शुभेच्छा !

***

राधिका अघोर/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2331187) अभ्यागत कक्ष : 14