संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रीसच्या सौदा उपसागरात भारतीय नौदलाच्या त्रिशूल युद्धनौकेचे आगमन

Posted On: 01 NOV 2026 10:30AM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाची युद्धनौका त्रिशूल 31 ऑक्टोबर 2026 रोजी भूमध्य समुद्रातील आपल्या सुरू असलेल्या तैनातीदरम्यान ग्रीसमधील सौदा उपसागरात दाखल झाली.

या बंदर भेटीदरम्यान भारतीय नौदल आणि ग्रीक नौदल यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी जहाजावरील कर्मचारी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतील. यामध्ये ग्रीक नौदल आणि अथेन्स येथील भारतीय दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद, व्यावसायिक चर्चा, एकमेकांच्या जहाजांना भेटी, सांस्कृतिक देवाणघेवाण तसेच सौदा उपसागरातील नौदल सहाय्यक उपक्रम (एनएसए) आणि नाटोच्या सागरी प्रतिबंधात्मक कारवाई प्रशिक्षण केंद्रातील (एनएमआयओटीसी) सुविधांची माहिती घेणे यांचा समावेश आहे.

जहाजावरील कर्मचारी सौदा उपसागर युद्ध स्मशानभूमीत जाऊन शहीद जवानांना आदरांजलीही अर्पण करतील. बंदर भेटीदरम्यान हे जहाज पर्यटकांसाठी खुले ठेवण्यात येईल.

या भेटीमुळे भारतीय नौदल आणि ग्रीक नौदल यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल.

***

यश राणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2331127) अभ्यागत कक्ष : 21