Posted On:
31 OCT 2026 3:38PM by PIB Mumbai
दूरदृष्टीचे कृतीत रुपांतर
सामायिक सागरी क्षेत्र, सामायिक सुरक्षा आणि सामायिक समृद्धी
30 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2026 या काळात आयोजित करण्यात आलेला बिमस्टेकचा उद्घाटनपर सागरी सुरक्षा सराव हा बिमस्टेक सदस्य राष्ट्रांमधील सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड यांना एकत्र आणणारा हा सराव, बंगालच्या उपसागरातील प्रादेशिक सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धीसाठी सदस्य राष्ट्रांच्या सामायिक वचनबद्धता आणखी दृढ करतो.
“बिमस्टेक: समृद्ध, सक्षम आणि खुले” या संकल्पनेवर आधारित 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा सराव सहभागी राष्ट्रांमधील सागरी सहकार्य आणि कार्यान्वयन संबंध वाढवण्यासाठी एक व्यावहारिक आराखडा प्रदान करतो. परस्पर सागरी हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून तसेच प्रादेशिक सुरक्षा यंत्रणा मजबूत करून, 'दूरदृष्टीचे कृतीत रुपांतर' करण्याच्या दिशेने बिमस्टेकचा सामूहिक निर्धार यातून दिसून येतो.
बंगालचा उपसागर हा दक्षिण आणि आग्नेय आशियाला जोडणारा तसेच व्यापार, संपर्क व्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक विकासाला आधार देणारा महत्त्वपूर्ण सागरी प्रदेश आहे. बिमस्टेक सदस्य राष्ट्रांमध्ये आंतरकार्यक्षमता वाढवणे, सागरी क्षेत्रातील जागरूकता मजबूत करणे, समन्वय यंत्रणा सुधारणे आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे, हा या सरावाचा उद्देश आहे.
हा सराव अंदमान आणि निकोबार बेटांचे सामरिक महत्त्व आणि भारताची पहिली एकात्मिक त्रि-सेवा कमांड असलेल्या अंदमान आणि निकोबार कमांडची (एएनसी) भूमिका देखील अधोरेखित करतो. महत्त्वाच्या सागरी दळणवळण मार्गांवर असलेले त्याचे स्थान आणि सागरी टेहळणी, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण, शोध आणि बचाव तसेच प्रादेशिक सहभाग यांमधील त्याची क्षमता, यांमुळे हे क्षेत्र बंगालच्या उपसागरातील सागरी सुरक्षेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनते.
बिमस्टेक राष्ट्रे या सरावासाठी एकत्र आली असून त्यांनी एका सुरक्षित, खुल्या आणि सर्वसमावेशक सागरी क्षेत्राप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. हा सराव ‘सामायिक सागरी क्षेत्र, सामायिक सुरक्षा आणि सामायिक समृद्धी’ या भावनेचे प्रतीक असून, शांतता, स्थैर्य आणि शाश्वत विकासाच्या दिशेने प्रादेशिक एकजूट दर्शवतो.
_20261031154030_6bece5.jpeg)
(1)_20261031154047_a98cca.jpeg)
_20261031154059_f71845.jpeg)
(1)_20261031154107_c5bd83.jpeg)
***
माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai