गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश/केंद्रीय सशस्त्र पोलीस दले /केंद्रीय पोलीस संघटनांमधील 490 कर्मचाऱ्यांना वर्ष 2026 साठी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ जाहीर


उत्कृष्ट कार्याची दखल, उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन आणि संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचवण्यासाठी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’

Posted On: 31 OCT 2026 9:55AM by PIB Mumbai

 

विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश/केंद्रीय सशस्त्र पोलीस दले /केंद्रीय पोलीस संघटनांमधील 490 कर्मचाऱ्यांना वर्ष 2026  साठी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ जाहीर  करण्यात आले आहे. हे पदक उत्कृष्ट कार्याची दखल घेणे, उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन देणे आणि संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचवण्यासाठी दिले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावेल.

केंद्रीय गृह मंत्रालयाने 1 फेब्रुवारी 2024 रोजी 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक' साठी अधिसूचना जारी केली होती. पोलीस दल, सुरक्षा संस्था, गुप्तचर विभाग, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या शाखा/विशेष शाखा, केंद्रीय पोलीस संघटना/केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/राष्ट्रीय सुरक्षा गार्ड/आसाम रायफल्स आणि देशभरातील न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रातील  उत्कृष्ट कामगिरी, तपास कार्यात उल्लेखनीय सेवा, अपवादात्मक कार्यक्षमता, अत्यंत धाडसी गुप्तचर सेवा बजावणाऱ्यांना तसेच न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रात कार्यरत सरकारी वैज्ञानिक म्हणून प्रशंसनीय कार्य करणाऱ्यांना हे पदक देऊन गौरवण्यात येते.

हे पदक दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जाहीर केले जाते.

पुरस्काराने सन्मानित कर्मचाऱ्यांची यादी गृह मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे - https://www.mha.gov.in (पुरस्कार विजेत्यांच्या यादीसाठी येथे क्लिक करा)

***

शिल्पा पोफळे/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330747) अभ्यागत कक्ष : 15