Posted On:
28 OCT 2026 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री शिनजिरो कोइझुमी यांची आज फिलीपिन्समधील सेबू येथे 'आसियान डिफेन्स मिनिस्टर्स मीटिंग एडीएमएम - प्लस'च्या पार्श्वभूमीवर भेट झाली. ऑगस्टमध्ये झालेल्या भेटीनंतर त्यांनी ठरवलेल्या दिशेनुसार द्विपक्षीय संरक्षण सहकार्यात होत असलेल्या निरंतर प्रगतीचे दोन्ही मंत्र्यांनी स्वागत केले. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
- भारतीय नौदलाच्या उपप्रमुखांच्या जपान भेटीसारख्या संधींमुळे, दोन्ही बाजूंच्या सामरिक आणि कार्यात्मक गरजा पूर्ण करणाऱ्या ठोस सागरी सुरक्षा सहकार्यावरील चर्चेत प्रगती झाली आहे. सुरुंग प्रतिबंधक क्षमता वाढवणे आणि जपानचे तांत्रिक कौशल्य आणि भारताच्या उत्पादन क्षमतांचा उपयोग करून नौदल जहाजबांधणी आणि डिझाइनमध्ये संयुक्त विकासाची शक्यता तपासणे यांचा यामध्ये समावेश आहे.
- भारत-जपान हवाई दलांच्या 'वीर गार्डियन 26' या सरावाच्या वेळी जपान एअर सेल्फ-डिफेन्स फोर्सच्या लढाऊ विमानांनी पहिल्यांदाच भारतात दिलेल्या भेटीनंतर, तसेच या सरावाच्या निमित्ताने जपान एअर सेल्फ-डिफेन्स फोर्सच्या चीफ ऑफ स्टाफ यांनी केलेल्या भारत भेटीनंतर, दोन्ही हवाई दलांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या चर्चेला चालना मिळाली आहे.
- टोकियोमधील भारतीय दूतावासात 'भारत-जपान संरक्षण उद्योग मंचा'चे यशस्वी आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये दोन्ही देशांतील सुमारे 40 कंपन्यांनी सहभाग घेतला.
या वर्षाच्या उत्तरार्धात टोकियो येथे चौथी जपान-भारत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय बैठक, तसेच जपान-भारत संरक्षण मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्याच्या दिशेने चर्चेला गती देण्याबाबत मंत्र्यांनी सहमती दर्शवली.
या बैठकीनंतर ‘एक्स’ या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये, संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले की, भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी चर्चेदरम्यान नवीन मार्गांचा शोध घेण्यात आला. मुक्त, खुल्या आणि शांततापूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारत आणि जपानची सामायिक वचनबद्धता अत्यंत महत्त्वाची आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai