संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-इंडोनेशिया संयुक्त विशेष दल सराव


इंडोनेशियातील बान्युवांगी येथे गरुड शक्ती सरावाचा प्रारंभ

Posted On: 27 OCT 2026 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2026

भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संयुक्त विशेष दल सराव गरुड शक्ती, इंडोनेशियातील बान्युवांगी येथे सुरू झाला आहे. हा  11 वा   सराव 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. भारतीय तुकडीमध्ये पॅराशूट रेजिमेंटच्या जवानांचा समावेश आहे, तर इंडोनेशियन तुकडीमध्ये इंडोनेशियाच्या विशेष दलातील जवानांचा समावेश आहे.

या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या विशेष दलांमधील परस्पर सामंजस्य, सहकार्य आणि संयुक्त कार्यक्षमता अधिक दृढ करणे हा आहे. या प्रशिक्षणामध्ये जंगल परिसरातील विशेष मोहिमांसाठी लागणाऱी रणनीती, विविध तंत्रे आणि कार्यपद्धतींवर भर देण्यात आला आहे. यामध्ये अडथळे पार करणे, अचूक नेमबाजी, गिर्यारोहण, हवाई हल्ल्यांचे प्रशिक्षण आणि लढाईच्या सज्जतेसाठी कठोर सराव सत्रांचा समावेश आहे. तसेच, शस्त्रे, उपकरणे आणि कार्यात्मक पद्धतींबाबत तज्ञ ज्ञान व माहितीचे आदानप्रदान  केले  जाणार आहे.

या संयुक्त प्रशिक्षणाची सांगता एका मूल्यांकन सराव सत्राने होईल, ज्यामध्ये प्रत्यक्ष मोहिमेसारख्या परिस्थितीचे अनुकरण असेल. याद्वारे दोन्ही तुकड्यांची सहनशक्ती, समन्वय आणि लढाऊ सज्जता तपासली जाईल.

हा सराव भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संरक्षण सहकार्य आणि द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकट करेल.

 

सोनाली काकडे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2329117) अभ्यागत कक्ष : 9